मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी

सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी

स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे. सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे.

स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे. सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे.

स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे. सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे.

नवी दिल्ली, 16 जानेवारी : मागील काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. सर्वात मोठा निशाणा डिजिटल बँकिंग (Digital Banking) आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन (Online transaction) करणाऱ्यां लोकांना केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँक अकाउंटबाबत सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता वेळोवेळी बँका, आरबीआय आणि सरकारकडूनही याबाबत लोकांना सतर्क केलं जात आहे.

सायबर आरोपी लोकांची फसवणूक करण्यासाठी, त्यांना लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धती अवलंबत आहेत. आता या स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे.

सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचं बँक अकाउंट खाली करत आहेत. लोकांनी कोणत्याही मेसेजवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसात करावी, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

अशाप्रकारच्या मेसेजद्वारे फसवणूक -

युजर्सला एक मेसेज पाठवला जातोय, ज्यात लिहिलेलं असतं की, तुमच्या बँक अकाउंटमध्ये नॉमिनीला जोडण्यात आलं आहे. 30 मिनिटांत नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. जर असं झालं नसल्यास, खालील लिंकवर क्लिक करा आणि तक्रार दाखल करा. अशाप्रकारच्या मेसेजद्वारे लोकांनी ऑनलाईन फसवणूक केली जात आहे.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स ग्राहकांची संपूर्ण माहिती चोरी करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारे आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. अनेक युजर्स कोणत्याही लिंकवर क्लिक करतात, त्यामुळे हॅकर्स ग्राहकांची माहिती सहजपणे मिळवू शकतात.

त्याशिवाय, सध्या फ्रॉडस्टर्स स्कॅमर, फिशिंग ईमेल, एसएमएस आणि फोन कॉल करून लोकांची बँक खाती खाली करत आहेत. हे फ्रॉडस्टर्स स्वत: ला बँक ऑफिसर, आरबीआय ऑफिसर, इनकम टॅक्स ऑफिसर सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. एवढंच नाही, तर आता हे फसवणूक करणारे बँकिंग App बनवतात आणि युजर्स त्यांच्या जाळ्यात येतात. ज्यावेळी युजर्स असे बनावट ऍप डाउनलोड करतात, त्यावेळी सायबर फ्रॉडस्टर्स त्यांच्या खात्यात ऑनलाईन फ्रॉड करून मोठी फसवणूक करतात. त्यामुळे ग्राहकांनी, युजर्सनी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, आणि ऑनलाईन पेमेंटवेळी सावधगिरी बाळगा.

First published:
top videos

    Tags: Cyber crime