केरळ, 19 ऑक्टोबर : आजकाल लग्नाआधी प्री-वेडिंग (Pre-Wedding) शूट करण्याची क्रेझ आहे. हा नवा ट्रेंड सध्या सुरू झाला आहे. आपलं प्री-वेडिंग शूट भारी करण्यासाठी लोकं वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र केरळमधल्या एक कपलनं एक वेगळाच प्रयोग केला, त्यांनी चक्क जंगलामध्ये फक्त चादर गुंडाळून हॉट कपल फोटोशूट केलं. गेल्या काही दिवसांपासून ऋषी आणि लक्ष्मी यांचे प्री-वेडिंग शूट चर्चेचा विषय झाला आहे.
केरळमधील ऋषी कार्तिकेयन याचा 16 सप्टेंबर रोजी लक्ष्मीशी विवाह झाला. लग्नाआधी या दोघांनी प्री-वेडिंग शूट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी केरळमधील चहाच्या शेतात हॉट फोटोशूट केले. त्यांनी केवळ पांढऱ्या चादर गुंडाळून फोटो काढले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
वाचा-बाप रे! महिला पडली चक्क 'भुताच्या' प्रेमात, फसवणूक झाल्यानंतर करायचंय ब्रेकअप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.