आतापर्यंत आपण भुतानं पछाडल्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील पण भुताच्या प्रेमात कुणी पडेल आणि भुताकडून ब्रेकसाठी तगादा लावेल असा विचार तरी करता येईल का? अनेक सिनेमांमध्ये भुतांच्या प्रेमात पडल्याचं किंवा मैत्री केल्याचं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात असं घडत यावर विश्वास न बसण्यासारखाच आहे. मात्र इंग्लंड इथे अशी घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
ब्रिटनमधील एम्थिस्ट रिलाम नावाच्या महिलेने काही काळापूर्वी दावा केला होता की ती भुतासोबत रिलेशनमध्ये आहे. ही महिला या भुताच्या मुलाची आई देखील होऊ इच्छीते असा दावाही करण्यात आला होता. पण आता हे नात तिला नको असून संपवण्याबाबत ती सध्या विचार करत आहे. 2018 मध्ये एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात दावा केला होताा.