शारजा, 18 ऑक्टोबर : ब्रेक फेल होऊन अनेकदा रस्त्यांवर भीषण अपघात झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र अति घाईमुळे पेट्रोल पंपाला गाडी आदळ्याचा तुम्ही कधी पाहिले नसाल. मात्र असा भीषण अपघात शारजामध्ये झाला. एक कारचालक शारजामधील रिफ्युएलिंग मशीनमध्ये घुसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा थरार कैद झाला. या व्हिडीओमध्ये चालक बेपर्वाईने गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनावरचा ताबा सुटला आणि गाडी थेट पेट्रोल पंपवर येऊन धडकली. या व्हिडीओमध्ये गाडी लेन बदलून येताना दिसत आहे. गल्फ टुडेनं या अपघाताच व्हि़डीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. वाचा- बाबो! पिळदार शरीर, 6 पॅक अॅब्स असलेल्या पोलिसांची परेड पाहून व्हाल शॉक
वाचा- VIDEO: सुसाट कारची जोरदार धडक आणि ट्रॅक्टरचे झाले तुकडे; थोडक्यात वाचला चालक शारजाह पोलीस प्रमुख मेजर जनरल सैफ अल झारी अल शमसी यांनी रात्री 11.45 वाजता ऑपरेशन रूममध्ये एक रिपोर्ट आल्याची माहिती दिली. यात एका वाहनाचा पेट्रोल पंपवर अपघात झाल्याचे दिसत होते. या अपघातात दोन जण जखमी झाले. सुदैवानं कोणाचाही मृत्यू झाला नाही. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर चालकावर कारवाई केली जाणार आहे.