मुंबई, 21 जुलै : राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात सत्तांतर झालं आहे. पण सर्वसामान्यांच्या समस्या 'जैसे थे'च आहेत. सर्वसामान्यांना सध्या पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहेत. त्यापैकी रस्त्यांवरील खड्डे ही मोठी समस्या आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा 'काय ते झाडी, काय ते डोंगार, काय ती हाटील, सगळं ओकेमध्ये आहे', हा डायलॉग अतिशय चर्चेत आहे. त्यांच्या याच डायलॉगचा आधार पकडत कल्याणच्या एका तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुर्दशेवर उपरोधिकपणे भाष्य केलं आहे. तरुणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यात खड्डे ही गंभीर समस्या आहे. खड्ड्यांमुळे ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत अनेकजण दगावल्याची माहिती समोर आली आहे. तरीही ते खड्डे बुजवण्यासाठी हवी तशी कारवाई केली जात नाही. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरातही तीच गत आहे. कल्याण डोंबिवलीत अनेक रस्त्यांवर आजच्या घडीला खड्ड्यांचं साम्राज्य आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. पण खड्ड्यांना बुजवण्याचं काम हवं तसं होताना दिसत नाही. विशेष म्हणजे खड्ड्यांच्या डागडुजीचं कामदेखील होतं. पण ते हवं तसं होत नाही. अनेक ठिकाणी डागडुजी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात पुन्हा रस्त्याची अवस्था तशीच होते. त्यामुळे केडीएमसीवर सर्वसामान्यांकडून प्रचंड टीका केली जाते.
VIDEO : 'काय तो पाऊस, काय ते खड्डे, केडीएमसी ओकेमध्ये', कल्याणच्या तरुणाचा Video Viral #KDMC #Kalyan #dombivali #potholes pic.twitter.com/2DoOa8kdyP
— News18Lokmat (@News18lokmat) July 21, 2022
('हरकत नाही माझ्यासारखं खोटं बोलं'; सिद्धार्थनं दिला क्रांतीला सल्ला, पाहा धम्माल VIDEO)
या दरम्यान कल्याण डोंबिवीलीतील खड्ड्यांच्या दुर्दशेवर भाष्य करणारा एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुण विनोदी शैलीत केडीएमसी प्रशासनावर खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन टीका करताना दिसत आहे. "आधी मला पोहता येत नव्हतं. पण आता कल्याण डोंबिवलीच्या खड्ड्यामुळे मला पोहता येतं. काय तो पाऊस, काय ते खड्डे, किती तो टॅक्स, केडीएमसी ओकेमध्ये, माझी केडीएमसी, माझा अभिमान", असे उद्गार संबंधित तरुण काढताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: KDMC, Viral video.