मुंबई, 21 जुलै: मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री क्रांती रेडकर एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. आजवर दोघांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघांचे आगामी प्रोजेक्टही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र त्या आधी सिद्धार्थ जाधवनं क्रांतीला एक सल्ला दिला आहे. आणि सल्ला साधा सुधा नाही तर चक्क खोट बोलण्याचा सल्ला दिला आहे. दोघांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सिद्धूनं दिलेला सल्ला ऐकून क्रांती देखील अवाक झाली आहे. सिद्धार्थनं क्रांती बरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता तुम्हाला वाटेल की सिद्धार्थनं खरोखर क्रांतीला खोटं बोलण्याचा सल्ला दिला आहे तर नाही. दोघांचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा सोशल मीडियावरचा रिल व्हिडीओ आहे. इन्स्टाग्रामवर सध्या ट्रेडिंग डायलॉग्सवर सिद्धार्थ आणि क्रांतीनं रिल केला आहे. या रिल व्हिडीओमध्ये सिद्धार्थ क्रांतीला म्हणतो, ‘बेबी तु किती क्यूट आहेस’. त्यावर क्रांती त्याला म्हणते, ‘बेबी तु ही क्यूट असतास तर मीही तुला असं बोलू शकले असतेट. त्यावर सिद्धार्थ ‘काहीच हरकत नाही तुही माझ्यासारखं खोटं बोलं’ असा जबरदस्त सल्ला तिला देतो. सिद्धार्थच्या उत्तरानं क्रांती चांगलीच शॉक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा - Santosh Juvekar: संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टमुळे भारावले प्रेक्षक; जुन्या आठवणींना दिला उजाळा
‘क्रांती सुनो माझा पहिला रिमिक्स रिल व्हिडीओ माझी बेस्टी क्रांती रेडकरबरोबर’, असं कॅप्शन देत सिद्धार्थनं हा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनाही हसू आवरलेलं नाही. अनेक चाहत्यांनीही लाफ्टर इमोजी कमेंटमध्ये शेअर केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर कलाकारही प्रचंड सक्रीय झाले आहेत. केवळ पोस्टच नाही तर धम्माल व्हिडीओ आणि व्लॉग्स ही कलाकार करताना दिसतात. त्यात कलाकारांचे रिल्स तर प्रचंड व्हायरल होत असतात. सिद्धार्थ आणि क्रांती यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर, क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं लंडनमध्ये सिनेमाचं शुटींग झालं आहे. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘तमाशा लाईव्ह’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. काही दिवसात सिद्धार्थचा ‘दे धक्का 2’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.