मराठी बातम्या /बातम्या /Viral /..अरेच्चा! राष्ट्राध्यक्ष Joe Biden म्हणाले, 'अमेरिकेच्या First Lady चे पती आहेत Corona Positive'

..अरेच्चा! राष्ट्राध्यक्ष Joe Biden म्हणाले, 'अमेरिकेच्या First Lady चे पती आहेत Corona Positive'

जो बायडेन म्हणाले, 'फर्स्ट लेडीच्या पतीला कोरोना झाला आहे. त्यामुळं कार्यक्रमात थोडासा बदल करावा लागेल'. मात्र, असं म्हणताच राष्ट्राध्यक्षांना त्यांची चूक लक्षात आली. मात्र, लोक हसू लागले. मात्र, बायडेन यांनी बाजू सावरून घेत त्यांची पत्नी जिल यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 16 मार्च : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेत महिला इतिहास महिन्यानिमित्त लोकांना संबोधित केलं. याअंतर्गत ते आज 'समान वेतन दिन' (Equal Pay Day) कार्यक्रमाला उपस्थित होते. यादरम्यान त्यांची बोलण्यात गफलत झाली आणि त्यांनी चुकून कमला हॅरिस यांना 'फर्स्ट लेडी' (first lady) म्हटलं.

कमला हॅरिस (Kamala Harris) या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत आणि जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन (Jill biden) या फर्स्ट लेडी आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला फर्स्ट लेडी म्हणतात. तर उपराष्ट्राध्यक्ष महिला असल्यास तिच्या पतीला सेकंड जेंटलमन (second gentleman) म्हटलं जातं.

काय घडला प्रकार?

जो बायडेन म्हणाले, 'फर्स्ट लेडीच्या पतीला कोरोना झाला आहे. त्यामुळं कार्यक्रमात थोडासा बदल करावा लागेल'. मात्र, असं म्हणताच राष्ट्राध्यक्षांना त्यांची चूक लक्षात आली. कारण प्रत्यक्षात कमला हॅरिस यांचे पती म्हणजेच दुसरे जेंटलमन डग एमहॉफ कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

हे वाचा - आत्मघातकी बॉम्बस्फोटानं पुन्हा हादरला पाकिस्तान : बलुचिस्तानात 4 ठार, 10 जखमी

मात्र, जो बायडेन यांनी असं म्हणताच तिथं उपस्थित असलेले लोक हसू लागले. यानंतर बायडेन स्वतःही थोडेसे हसले आणि पत्नी जिलकडे बोट दाखवत म्हणाले, 'हो ती ठीक आहे, ती (जिल) ठीक आहे.'

यानंतर बायडेन म्हणाले की, मी जो बायडेन आहे आणि मी जिल बायडेन यांचा पती आहे, मला याचा अभिमान आहे. यानंतर जो बायडेन यांनी महिलांना समान वेतन देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

हे वाचा - कच्च्या तेलाच्या सवलतीचा रशियाचा प्रस्ताव भारत स्वीकारेल का?

व्हाईट हाऊसनंही केली पुष्टी

कमला हॅरिस यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी व्हाईट हाऊसनंही केली आहे. खरं तर, कमला हॅरिसदेखील बायडेन यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणार होत्या. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असूनही त्या या कार्यक्रमापासून दूर राहिल्या.

कमला हॅरिस यांच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी सांगितलं की, खबरदारी म्हणून त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. विशेष म्हणजे कमला हॅरिस यांच्या पतींनी कोरोनाचा बूस्टर डोसही घेतला आहे. कमला हॅरिस म्हणाल्या की, सध्या त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता त्यांच्या आणखी चाचण्या केल्या जातील.

First published:
top videos

    Tags: Corona, Joe biden, Kamala Harris