Home /News /viral /

पापणी लवताच पडला 100 फूटी उंच टॉवर, पाहा थरारक VIDEO

पापणी लवताच पडला 100 फूटी उंच टॉवर, पाहा थरारक VIDEO

एका क्षणात पाडला 100 फूट उंच टॉवर, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

    जामनगर, 05 जानेवारी : सिक्का थर्मल पावर स्टेशनजवळ एक 100 फूट उंच टॉवर पाडण्यात आला. या पाडकामाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जामनगर येथील हा थर्मल पावर स्टेशनचा टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. त्यामुळं दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं हा टॉवर पाडण्यात आला. दरम्यान, 100 फूट उंच टॉवर पडताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. मात्र तज्ञांच्या मदतीनं हा टॉवर पाडण्यात आला. हा टॉवर पाडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा 100 फूटी टॉवर पाडण्याआधी आसपासचा परिसर खाली करण्यात आला होता. त्यानंतरच टॉवरचे पाडकाम सुरू करण्यात आले. दरम्यान लोकांनी मोबाईच्या कॅमेरामध्ये या टॉवरच्या पाडकामाचा व्हिडीओ काढला. वाचा-दारूच्या नशेत पोलीस अधिकारी झिंगला, थेट मुख्यमंत्र्यांना दिली धमकी वाचा-मुंबईकरांच्या जीवाला अंड्यांमुळे मोठा धोका, खाण्याआधी एकदा नक्की विचार करा वाचा-VIDEO : युवा फलंदाजानं मोडला युवराजचा रेकॉर्ड, 6 चेंडूत लगावले 6 सिक्स! वाचा-LIVE सामन्यात घुसले 2 साप, थोडक्यात वाचला अजिंक्य रहाणे; PHOTO VIRAL सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. जामनगर येथील हा थर्मल पावर स्टेशनचा टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या