जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांच्या जीवाला अंड्यांमुळे मोठा धोका, खाण्याआधी एकदा नक्की विचार करा

मुंबईकरांच्या जीवाला अंड्यांमुळे मोठा धोका, खाण्याआधी एकदा नक्की विचार करा

मुंबईकरांच्या जीवाला अंड्यांमुळे मोठा धोका, खाण्याआधी एकदा नक्की विचार करा

अंड्यांमुळे शक्ती वाढते हे खरं असलं तरी खातांना थोडी काळजी घ्यावी लागाते. नाही तर अंडी खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 05 जानेवारी : मुंबईत जर तुम्ही अंडे खात असाल तर सावधान! एक धक्कादायक प्रकार मुंबईतील कांदिवलीत आढळून आलाय. पश्चिम मध्ये चारकोप भागातून एका दुकानांमध्ये चायनीज आणि प्लास्टिकचे अंडे मिळाल्यामुळे पूर्ण परिसरात खळबळ उडालीय. शनिवारी संध्याकाळी चारकोप परिसरात राहणाऱ्या नागरीकाने एका दुकानांमध्ये अंडी विकत घेतली. त्या वेळी त्यांचा लक्षात आले की ही अंडी नकली आहेत. त्यावेळी ग्राहक आणि दुकानदारामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर स्थानिक नगसेविका संध्या दोषी यांची पती विपुल दोशी यांनी दुकानात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की हे प्लास्टिकचे अंडे आहेत त्यानंतर त्यांनी जवळ असलेला अंड्याच्या दोन टेम्पो शिवसैनिकांच्या मदतीने 4000 अंड्यांसह चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिलेत. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोला सील करून अंडी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना तपासणीसाठी दिली आहेत. हिवाळ्यात अंड्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे बनावट अंडी बाजारात विकायला आणली जातात अशी शक्यताही व्यक्त केलीय जातेय. संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे असं म्हटलं जातं. अंड्यांमुळे शक्ती वाढते हे खरं असलं तरी खातांना थोडी काळजी घ्यावी लागाते. नाही तर अंडी खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. अंडी हे शरीरातल्या प्रोटीनची गरज पूर्ण करतं. अंड खाल्ल्यानंतर त्यातल्या प्रोटीनचं रुपांतर एल्बुमिनमध्ये होतं. शरीरातल्या अनेक गरजा त्यामुळे पूर्ण होतात. साधारणपणे दोन अंडी खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. मात्र त्यापेक्षा जास्त अंडी खायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. हिवाळ्यात अंडी खा, पण जपून! अंड्याविषयीच्या या 7 गोष्टी तुमचे डोळे उघडतील जे लोक बॉडी बिल्डिंग त्यांना प्रोटीनची जास्त गरज असते. पण इतरांसाठी त्याची गरज वेगळी आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दोनपेक्षा जास्त अंडी खाल्ल्यामुळे अपाय होऊ शकतो. पोट बिघडणं, अ‍ॅसिडीटी त्याचबरोबर दीर्घकाळासाठी किडनीही खराब होऊ शकते कारण जास्त प्रोटीन पचविण्यासाठी त्याला जास्त काम करावं लगातं.

या सोप्या उपायांनी तुम्ही जास्त काळ टिकवू शकाल कडधान्य आणि भाज्या

भरपूर प्रोटीन असल्याने अंडी हिवाळ्यात खाल्ली जातात. त्यात 9 प्रकारचे अमीनो अ‍ॅसिड असतात. त्याचबरोबर ओमेगा 3नही असतं. दररोज दोन अंडी खाणं हे बुद्धिलाही फायदेशीर असून त्यामुळे बुद्धीचा तल्लखपणा वाढतो आणि तरतरीतही वाटतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: eggs
  • First Published :
जाहिरात
जाहिरात