क्राइस्टचर्च, 05 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 सिक्स लगावण्याची कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगला आता एका युवा खेळाडूनं टक्कर दिली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी टी -20 क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकून एक विशेष कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा कार्टर हा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी -२० मध्ये भारताच्या युवराज सिंगच्या नावावर सलग सहा षटकारांचा विक्रम आहे. न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी घरगुती टी -20 स्पर्धेत कँटरबरी संघाकडून खेळून ही कामगिरी केली. लिओने नॉर्दर्न नाईट्स विरुद्धच्या षटकात सलग सहा षटकार लगावत ही कामगिरी केली. त्याने नाईट्स संघाचा फिरकी गोलंदाज अँटोन डेवसिचच्या एका षटकात सलग सहा षटकार ठोकले. कार्टरने डाविकच्या 16 व्या षटकात आलेल्या डेव्हिचच्या एका षटकात सलग 6 षटकार मारले. वाचा- LIVE सामन्यात घुसले 2 साप, थोडक्यात वाचला अजिंक्य रहाणे; PHOTO VIRAL युवराज सिंगच्या नावावर जागतिक विक्रम 2007मध्ये आयसीसी टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध सलग सहा चेंडूंमध्ये सहा षटकार मारले. युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात युवराज सिंगने ही कामगिरी केली. वाचा- श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघात होणार 3 मोठे बदल! या खेळाडूंना मिळणार जागा
Devcich to Leo carter
— Heisenberg (@RitwikBittu) January 5, 2020
6 sixes in an over
amazing innings while chasing 220. pic.twitter.com/tUUZo5BUNe
वाचा- एका सिक्ससाठी क्रिकेटपटू देणार 18 हजार! ‘हे’ आहे कारण एका षटकात 6 सिक्सर मारणारे फलंदाज एका षटकात सहा षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोटर हा जगातील सातवा फलंदाज आहे. वेस्ट इंडीजचा गॅरी सोबर्स, भारताचा रवी शास्त्री आणि अष्टपैलू युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शेल गिब्स, इंग्लंडचा रॉस विटली आणि अफगाणिस्तानचा फलंदाज हजरतुल्ला जाझाई यांनी ही विशेष कामगिरी नोंदविली आहे.