दारूच्या नशेत पोलीस अधिकारी झिंगला, थेट मुख्यमंत्र्यांना दिली धमकी

दारूच्या नशेत पोलीस अधिकारी झिंगला, थेट मुख्यमंत्र्यांना दिली धमकी

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता पोलिसही दिवसाढवळ्या बिहारमध्ये जाहीर झालेल्या दारू बंदीची खिल्ली उडवत आहेत.

  • Share this:

अरूण कुमार शर्मा

मुंगेर (बिहार), 05 जानेवारी : सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता पोलिसही दिवसाढवळ्या बिहारमध्ये जाहीर झालेल्या दारू बंदीची खिल्ली उडवत आहेत. बिहारमधील मुंगेर या शहरात एका तुरूंगात तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.

विनय कुमार सिंह असे मद्यधुंद पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून, शहरातील मुख्य रस्त्यावरच दारू पिऊन बसले होते. रस्त्यावर सुरू असलेल्या गोंधळानंतर आजूबाजूच्या लोकांनी स्थानिक कोतवाली पोलिस स्टेशनला याची माहिती दिलीय त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले आणि दारुच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जबदरस्ती गाडीत टाकले.

वाचा-काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच, चव्हाणांना मागे टाकत ठरले नंबर एक'

रस्त्यावरच सुरू होता ड्रामा

या पोलीस कर्मचाऱ्यानं दारूच्या नशेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, डीआयजी, एसपी लिप्पी सिंग आणि पत्रकारांनाही शिव्या घातल्या. या पोलीस कर्मचार्‍याचे हे नाटक पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले आणि दारुच्या नशेत असलेल्या पोलिसाला रूग्णालयात उपचार मिळाल्यानंतर अटक करण्यात आली.

वाचा-VIDEO : युवा फलंदाजानं मोडला युवराजचा रेकॉर्ड, 6 चेंडूत लगावले 6 सिक्स!

वाचा-VIDEO मतांसाठी पैसे दिले तर घ्या, मंत्री यशोमती ठाकूर यांचं वादग्रस्त विधान

पोलिसांनी अटक केली

मुख्यालयाचे डीएसपी मोहम्मद शिबली नोमानी यांनी या घटनेबाबत, पोलिसांना माहिती मिळताच नशेत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून विभागीय कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, बिहारमध्ये दारूबंदीचे कठोर कायदे आहेत आणि त्यावर पोलिसांकडून सातत्याने छापे घातले जातात आणि या प्रकरणात पोलिसांनी दारूच्या अनेक गुन्ह्यांचा बडगा उगारला होता आणि त्यासंबंधित बर्‍याच लोकांना अटक करुन तुरूंगात पाठविले होते.

First published: January 5, 2020, 5:55 PM IST
Tags: bihar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading