मुंबई 17 सप्टेंबर : प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याकडे खूप पैसे असावेत. अनेकांना तर असे पण स्वप्न पडतात, की रातोरात काहीतरी साक्षातकार व्हावा आणि आपल्या खूप पैसे मिळावे. असं वाटत असतं. परंतू विचार करा की खरंच तुमच्या बँकेत इतके पैसे आले तर…. ? काही लोक म्हणतील की मी गाडी घेईन, बंगला बांधेण, ट्राव्हल करणे, शॉपिंग करेन वैगरे-वैगरे… पण आपल्या बँक खात्यात हजारो कोटी रुपये पाहिल्यानंतर एका व्यक्तीने असे काम केले की त्याची हुशारी पाहून सगळेच हैराण झाले आहेत. गुजरातमधील रहिवासी रमेश सागर यांच्या डिमॅट खात्यात अचानक 11 हजार 677 कोटी रुपये आले. अचानक त्याच्या खात्यात इतके पैसे पाहून रमेशला आधी आश्चर्य वाटले. पण हे पैसे पाहून तो ना पळून गेला ना बँकेत गेला, पण त्याने असे काही केले की, ज्यांनी ते ऐकलं ते सगळेच चकित झाले. हे वाचा : Investment Tips: सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना? खरंतर त्यातील काही रक्कम रमेशने शेअर बाजारात गुंतवली. रमेश सागर हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करतात. तांत्रिक अडचणीमुळे, त्याच्या कोटक सिक्युरिटीज डिमॅट खात्यात 1 हजार 677 कोटी रुपये जमा झाले. त्यावेळेला त्यांनी लगेच हुशारी दाखवत त्यातील दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि त्यांनी त्यातून 5 लाख रुपये कमावले. जेव्हा कोटक सिक्युरिटीजना त्यांची चूक त्याच रात्री आठ वाजता लक्षात आली, तेव्हा त्यांनी खात्यातून रक्कम काढून घेतली. हे वाचा : Second Hand Cars: सेकंड हँड कार खरेदीत आता होणार नाही फसवणूक, सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल रमेश सागर यांनी सांगितले की 27 जुलै 2022 रोजी माझ्या खात्यात 11 हजार 677 कोटी रुपये येऊ लागले. यातील २ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवून मी ५ लाख रुपये कमावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.