मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips: सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना?

Investment Tips: सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि 21000 दरमाह मिळवा, काय आहे योजना?

NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 17 सप्टेंबर : तुम्हीही दर महिन्याला कमाईचा पर्याय शोधत असाल तर एक सरकारी योजना तुमच्या कामी येईल. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दरमहा 21 हजार रुपये मिळतील. म्हणजेच, तुम्हाला नोकरी न करता आणि व्यवसाय न करता दरमहा 21000 रुपये मिळतील. या सरकारी योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS). नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सरकारी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये इक्विटी आणि डेट दोन्ही साधनांचा समावेश आहे. एनपीएसला सरकारकडून हमी मिळते. निवृत्तीनंतर अधिक मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही NPS योजनेत गुंतवणूक करु शकता. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी NPS मध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि दरमहा 1000 रुपये जमा केले, तर निवृत्तीच्या वयापर्यंत तुमचे एकूण योगदान 5.4 लाख होईल. याशिवाय, तुम्हाला यामध्ये 10 टक्के वार्षिक परतावा मिळेल, ज्यामुळे तुमची गुंतवणूक 1.05 कोटी होईल.

Multibagger Stock: 18 हजारांच्या गुंतवणुकीवर बनले करोडपती; या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल

21 हजार पेन्शन दरमहा मिळणार जर NPS ग्राहकाने 40 टक्के कॉर्पसचे वार्षिकीमध्ये रूपांतर केले तर त्याचे मूल्य 42.28 लाख होईल. तर मासिक पेन्शन 10 टक्के वार्षिक दराने 21,140 रुपये असू शकते. एवढेच नाही तर NPS ग्राहकांना सुमारे 63.41 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. Aadhar Card: ब्लू आधारकार्ड काय असतं? कुणासाठी वापरलं जातं आणि कसं तयार करायचं? आयकर सवलतही मिळेल सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सुकन्या समृद्धी योजना इत्यादींप्रमाणेच NPS पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. यामध्ये कोणताही गुंतवणूकदार मॅच्युरिटी रकमेचा योग्य वापर करून मासिक पेन्शनची रक्कम वाढवू शकतो. NPS च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सूट मिळेल. NPS मध्ये गुंतवणुकीचे तीन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याचे पैसे कुठे गुंतवले जातील हे निवडायचे आहे. इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज आणि सरकारी रोखे यामध्ये पैसे गुंतवले जाऊ शकतात.
First published:

Tags: Investment, Money

पुढील बातम्या