जाहिरात
मराठी बातम्या / Viral / IPL पाहण्याचा असाही फायदा! अपघातानंतरही बाईकस्वार बचावला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

IPL पाहण्याचा असाही फायदा! अपघातानंतरही बाईकस्वार बचावला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

आयपीएलमुळे बचावला.

आयपीएलमुळे बचावला.

आयपीएल फिव्हरचा हा अनोखा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 23 मे : आयपीएलचा 16 वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. क्रिकेड चाहत्यांमध्ये आयपीएल ची इतकी क्रेझ पाहायला मिळते की त्यांच्या रिअल लाइफमध्येही आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळतो. असाच एका आयपीएल चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आयपीएल पाहिल्याने एक बाईकस्वार अपघातातून बचावला आहे. एका तरुणाची बाईक एका तरुणीला धडकली. पण या अपघातातून तरुण बचावला आहे. याचा कारण म्हणजे आयपीएल. आता अपघात आणि आयपीएलचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला लागेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर आयपीएल आणि अपघाताचं कनेक्शन तुम्हाला दिसून येईल. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण स्कुटीवरून जातो आहे. त्याच्यासमोरून एक तरुणी चालत येते आहे. स्कुटी तरुणीला धडकते. त्यानंतर तरुण-तरुणीत बाचाबाची होते. इतक्यात तिथं एक पोलीस येतो. तरुणी त्या तरुणाची चूक असल्याचं सांगते. तेव्हा पोलीस लगेच तरुणाला पोलिसात चल म्हणून सांगतात. तरुण आपली काहीच चूक नसल्याचं सांगतो. बोलता बोलता त्याचं लक्ष रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जातं. तसं त्याच्या डोक्यात पटकन क्लिक होतं. कारला धडकून ट्रकखाली गेला तरुण, पण अपघातानंतर पुढे जे घडलं ते अविश्वसनीय; पाहा VIDEO आयपीएलच्या रिव्ह्यू सिस्टमची त्याला आठवण होते आणि क्रिकेटच्या स्टाईलमध्ये तो पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज चेक करायला सांगतो. पोलीसही अम्पायरप्रमाणे रिव्ह्यू चेक करायला सांगतात. सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात आणि सत्य समोर येतं. तरुण नव्हे तर तरुणीची चूक असल्याचं समोर येतं. तरुणी रस्त्याने चालताना मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसतं. यानंतर पोलीस तरुण पोलिसांच्या तावडीत जाण्यापासून बचावतो. हा व्हिडिओ एका व्हिडीओ शूटचा भाग आहे आणि तो आयपीएलचे कट्टर चाहते असलेल्या तरुणांनी चित्रित केला आहे. यामध्ये आयपीएलच्या रिव्ह्यूप्रमाणे अपघाताचाही आढावा घेतला जाऊ शकतो आणि निष्पापांवर कारवाई टाळता येऊ शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चमत्कार की आणखी काही? अपघातात कारचा चुरा, तरी तरुणाला काहीच झालं नाही, पाहा Video @saintkishore नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करण्यात आल्याची माहिती आहे. नेटिझन्सही या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत आणि आपलं मत मांडत आहेत.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात