नवी दिल्ली, 11 मे : अपघाताचे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखाद्या गाडीची धडक जरी बसली तरी किती गंभीर दुखापत होऊ शकते हे तुम्हाला माहितीच आहे. असं असताना एक तरुण जो कारला धडकून ट्रकखाली गेला. पण त्यानंतर जे घडलं ते पाहून कुणालाही विश्वास बसत नाही आहे. अपघाता च्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक तरुण सायकलवरून जात होता. तेव्हा तो एका कारच्या दरवाजाला धडकला. त्यानंतर एका चालत्या ट्रकखाली गेला. संपूर्ण ट्रक त्या तरुणाच्या अंगावरून गेला. वाचतानाच तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य आलं असेल आणि अंगावर काटाही. पण तरुणासोबत जे घडलं ते प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू आहे. रस्त्याच्या कडेला काही गाड्या आहेत. समोरून एक मुलगा सायकल चालवत येतो. इतक्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या कारचा दरवाजा उघडला जातो. सायकलस्वार तरुण या कारच्या दरवाजाला आपटतो आणि सायकलवरून उडून थेट रस्त्यावर पडतो. तोच समोरून एक ट्रक येत असतो, त्या ट्रकखाली तो जातो. ट्रक त्याच्यावरून जातो, ट्रकचालकही तात्काळ ब्रेक मारतो आणि ट्रक थांबवतो. विश्वासच बसत नाहीये! मृत्यूवर अशी मात शक्यच नाही; VIDEO पाहून तुम्हीच सांगा, हे Real की Fake? आता या तरुणाचं काय झालं असेल, याची कल्पनाही तुम्हाला करवत नसेल. इतक्या भयंकर अपघातात तरुण काही बचावला नसेल. पण थोड्या वेळाने तुम्ही पुढे पाहाल तर ट्रकखालून कुणीतरी बाहेर येताना दिसते. ट्रकच्या पुढच्या भागाकडून. तुम्ही नीट पाहिलं तर हा तोच तरुण आहे, जो अपघातानंतर या ट्रकखाली गेला. तरुणाला काहीच झालं नाही आहे. तो सुखरूप आहे. सुदैवाने तो ट्रकच्या मधोमध होतो. चाकं त्याच्यावरून गेली नाही. त्यामुळेच त्याचा जीव बचावला. काळ आला होता पण वेळ नाही, देव तारी त्याला कोण मारी या म्हणींचा प्रत्यय इथं प्रत्यक्ष पाहायला मिळतो आहे. काहींनी याला देवाचा चमत्कार म्हटलं आहे. देवाने या व्यक्तीला दुसरं आयुष्य दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. VIDEO - जेसीबीतून आला ‘यमराज’, तर बोलेरोतून ‘देव’; चमत्कार पद्धतीने वाचला तरुणाचा जीव @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर काय वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.