जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला iPhone, चोरीची पद्धत पाहून अवाक व्हाल; VIDEO VIRAL

स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला iPhone, चोरीची पद्धत पाहून अवाक व्हाल; VIDEO VIRAL

सर्वांसमोर मोबाईल चोरी (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

सर्वांसमोर मोबाईल चोरी (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

मोबाईल दुकानात आयफोन चोरी करणाऱ्या या चोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जून : चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. चोरी चे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी रात्रीच्या वेळी गुपचूप लपून चोरी करताना, कुणी दिवसाढवळ्या नजर चुकवून चोरी करताना, तर कुणी रस्त्याने चालता चालता चोरी करताना दिसलं. पण सध्या चोरीचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वांच्या डोळ्यादेखत चोराने आयफोन चोरला आहे. एका मोबाईल दुकानात चोराने चोरी केली आहे. तीसुद्धा सर्वांसमोर. अगदी शांतपणे चोरी करून तो तिथून गप्पपणे निघून गेला आणि कुणाला समजलंही नाही. पण चोराची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. चोराने सर्वांसमोर कशा पद्धतीने आयफोनची चोरी केली ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं आहे. कर्माचं फळ! कारचालकाला लुटलं, पुढच्याच क्षणी बाईकस्वार चोरांसोबत भयंकर घडलं; Shocking Video सामान्यपणे दुकानात चोर चोरी करायला गेल्यावर एकतर तो एकटा असतो किंवा त्यांची गँग असते. विक्रेत्याला काही ना काही दाखवायला सांगून, त्याला बोलण्यात व्यस्त ठेवून ते कधी हात मारतात ते समजत नाही. पण हा चोर तर त्यांच्या एक पाऊल पुढे निघाला  त्याने नेमकं काय केलं ते व्हिडीओमध्येच पाहाय व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका मोबाईलच्या दुकानात खूप गर्दी दिसते आहे. तिथं एक व्यक्ती अगदी काऊंटरजवळ आहे. त्या व्यक्तीच्या हातात आधीच त्याचा एक मोबाईल आहे. ती विक्रेत्याला आयफोन दाखवायला सांगते. विक्रेता त्याला आयफोन काढून देतो. ती व्यक्ती आपला मोबाईल आणि आयफोन दोन्ही आपल्या हातात धरते. थोडा वेळा ती फोनला पाहिल्यासारखं करते. नंतर कुणाचं लक्ष नाही हे समजून तो आयफोन घेऊन गर्दीतून बाहेर पडते. दुकानातील ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला आहे. दारू चोरली, पण न पिताच चोराने स्वतःच दुकानात परत केली बाटली; का ते पाहा VIDEO नॉटीफॅमिली या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

चोराची हुशारी पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात