कॅनबेरा, 10 जून : आतापर्यंत चोरी च्या बऱ्याच घटना तुम्हाला माहिती असतील. चोरीचे कितीतरी व्हिडीओही सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. असाच एक चोरीचा व्हिडीओ जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्याच एका चोराने दारूच्या दुकानात दारूची चोरी केली. पण काही क्षणातच त्याने दारूची बाटली स्वतःच त्या दुकानात परत केली आहे. ऑस्ट्रेलियातील ही घटना आहे. एका दारूच्या दुकानात एक व्यक्ती गेली. तिथं त्याने दारूच्या बाटल्या चोरी केल्या. त्यानंतर त्याने दुकानातून पळण्याचा प्रयत्न केला. पण असं काही घडलं की त्याला दारू घेऊन पळता आलं नाही. त्याला चोरलेल्या दारूच्या बाटल्या पुन्हा दुकानात देण्याची वेळ आली. असं या चोरट्यासोबत काय घडलं ते तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा. व्हिडीओत तुम्ही पाहाल तर दारूचं मोठं दुकान आहे. एक व्यक्ती हातात काही दारूच्या बाटल्यांचे बॉक्स घेऊन काऊंटरकडे येताना दिसते. काऊंटवरवर एक महिला कर्मचारी आहे. व्यक्ती काऊंटरजवळ पोहोचते आणि आपण पैसे द्यायला येत आहोत, असं दाखवते. तशी काऊंटवरील महिला पैसे घेण्यासाठी तयार होते. तितक्या ती व्यक्ती दरवाजाच्या दिशेने पळत सुटते. VIDEO - बर्थडे आहे चोराचा! पोलिसांनीही केलं हटके विश; दिलं जबरदस्त ‘गिफ्ट’ आता अशी चोरी झाली तर दुकानातील कर्मचारी चोराला पकडायला धावतात, आरडाओरडा करतात. पण इथं मात्र तसं काहीच होताना दिसत नाही. काऊंटवरील महिला कर्मचारी अगदी शांत आहे. जसं काहीच झालं नाही. असंच ती वागते आहे. पण तिच्या अशा शांत राहण्यामागील कारण तुम्हाला पुढे समजेल. चोर दारूच्या बाटल्या घेऊन दरवाजापर्यंत पोहोचतो खरा. पण त्याला दरवाजातून बाहेर काही पडता येत नाही. कारण दरवाजा लॉक होता. दरवाजाजवळ गेल्यावर त्याला तो लॉक असल्याचं समजतं. आता काय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. दारू घेऊन तो तसाच मागे येतो आणि काऊंटवर त्या बाटल्या देतो. VIRAL VIDEO - 150 रुपयांच्या मीठ चोरीसाठी 15 लाखांच्या गाडीतून आले; VIP चोरांची अजब चोरी सीसीटीव्हीत कैद फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.