नवी दिल्ली, 17 जून : आपल्या कर्माची फळं आपल्याला इथंच भोगावी लागतात असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दोन बाईकस्वार चोरट्यांनी भररस्त्यात कारचालकाला लुटलं. पण पुढच्याच क्षणी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. त्यांच्यासोबत भयंकर घडलं. चोरी ची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. चोरीच्या बऱ्याच घटनांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. रस्त्याने चालताना किंवा गाडीवरून जात चालणाऱ्या लोकांची बॅग, पर्स, मोबाईल, चैन, मंगळसूत्र असं काय काय नाही पळवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. काही वेळा हे चोर लगेच पकडले जातात आणि त्यांची तिथंच धुलाई होते. तर काही वेळा ते पळून जाण्यात यशस्वी होतात पण नंतर पोलीस त्यांना शोधून चांगलाच चोप देतात. या व्हिडीओतील चोरांनाही त्यांनी केलेल्या चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. पण ती अशी की त्यांनी काय कुणीच विचार केला नसेल. VIRAL VIDEO - 150 रुपयांच्या मीठ चोरीसाठी 15 लाखांच्या गाडीतून आले; VIP चोरांची अजब चोरी सीसीटीव्हीत कैद व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक कार दिसते आहे. समोरून दोन व्यक्ती उभ्या आहेत. ज्यांच्या हातात शस्त्रही आहेत. शस्त्राचा धाक दाखवत ते कार थांबवतात. कारचा दरवाजा उघडायला लावतात आणि कारचालकाला लुटून पळतात. हे दोघंही बाईकवरून आले होते. तिथंच रस्त्याच्या कडेला त्यांनी बाईक पार्क केली. जसं त्यांनी कारचालकाला लुटलं तसं ते दोघंही धावत बाईककडे गेले. बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करू लागले. पण बाईक काही सुरू होईना. कारचालकही तिथंच थांबला होता. चोरांची बाईक सुरू होत नाही हे पाहून त्याने कार त्यांच्या दिशेने फिरवली आणि बाईकला धडक दिली. दारू चोरली, पण न पिताच चोराने स्वतःच दुकानात परत केली बाटली; का ते पाहा VIDEO @cctvidiots नावाच्या ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या चोरांचं पुढे काय झालं ते मात्र या व्हिडीओत दिसत नाही आहे.
— security footage (@security_footag) June 15, 2023
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांनी हे भयंकर असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी कारचालकाने जे केलं ते योग्यच आहे, या बदमाशांना अशीच शिक्षा मिळायला हवी असं म्हटलं आहे.