मुंबई 26 जानेवारी : दारू प्यायल्यानंतर लोक नशेच्या अवस्थेत वेगवेगळ्या गोष्टी करु लागतात. यामध्ये काही लोक शूर असल्याचं दाखवतात. तर काही लोक कोणाच्या तरी आठवणीत रडतात. जर कोणी रागात प्यायलं असेल तर मग त्या व्यक्तीला राग येतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची नाटके करताना तुम्ही अनेकदा लोकांना पाहिलं असेल. काही लोक नशेच्या अवस्थेत अधिक भावूक होतात, तर काही लोक त्यांच्या हृदयातील सर्व रहस्ये सांगतात. असेही म्हटले जाते की नशेत असलेले लोक नेहमी खरे बोलतात, परंतु तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे की नशेत असलेले लोक केवळ सत्यच बोलत नाहीत तर ते इंग्रजी देखील बोलू लागतात. हे ही पाहा : मद्यधुंद महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी आणि मग… कधी कधी या दारुड्यांचे इंग्रजी अशी असते की ती ऐकून हसू आवरत नाही. किंबहुना नशेच्या अवस्थेत माणसाची भाषेबद्दलची अस्वस्थता खूप कमी होते. त्यासोबतच ‘लोक काय विचार करतील’हा प्रश्न कधीच दारु प्यायलेल्या व्यक्तीला पडत नाही किंवा तो कधी विचार देखील करत नाही. यामुळेच दारूच्या नशेत कोणतीही व्यक्ती सहजपणे वेगवेगळ्या भाषा बोलू लागते. ही गोष्ट एका अभ्यासातून समोर आली आहे. लिव्हरपूल युनिव्हर्सिटी आणि किंग्स कॉलेज लंडनमध्ये भाषा आणि अल्कोहोल यांच्या संबंधाबाबत संशोधन करण्यात आले होते, ज्यामध्ये हे देखील सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनात दोन भाषांचे ज्ञान असलेल्या ५० जणांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व लोकांना दारू प्यायला देण्यात आली, त्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तीने दुसरी भाषा अधिक चांगल्या पद्धतीने बोलली, तर नशेच्या आधी त्याला तसे करता येत नव्हते. हे ही पाहा : वेगळ्या पद्धतीची चहा पिण्याच्या नादात असा फसला तरुण, आता स्वप्नात सुद्धा थरथर कापेल, पाहा Video म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीला दोन भाषा येतात. त्यावेळी दारु प्यायल्यानंतर तो आपली मुळ भाषासोडून दुसरी भाषा बोलतो, ते ही कशाचाही विचार न करता, कोणालाही न घाबरता. भारतात बऱ्याच लोकांना इंग्रजी म्हणण्याची जास्त इच्छा असते किंवा अनेक लोक दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करतात. यामुळेच तुम्हाला बरेच नशेमधील लोक दारु प्यायल्यावर बोलताना दिसतील. या संशोधनानंतर संशोधक निष्कर्षापर्यंत पोहोचले की थोडेसे अल्कोहोल तुमचे उच्चार सुधारते. यासोबतच तुमच्या आतील अस्वस्थताही कमी होते, तर जास्त दारू पिणारी व्यक्ती काही बोलण्याच्या स्थितीत नसते. त्यामुळे त्यांना ग्राह्य धरु शकले जात नाही. मात्र, हाही अंतिम निकाल मानला गेला नाही. शास्त्रज्ञांच्या मते, या विषयावर अधिक संशोधन केल्यानंतरच अंतिम निकाल दिला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.