दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके! 4 भावडांचा VIDEO तुफान व्हायरल

दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके!  4 भावडांचा VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ (Social Media Viral Video) कधीकधी खूप शानदार असतात. दरम्यान भारतीय संगीताचे चाहते जगभरात आहेत. पंजाबी गाण्यांची क्रेझ तर सर्वदूर पसरलेली आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ (Social Media Viral Video) कधीकधी खूप शानदार असतात. दरम्यान भारतीय संगीताचे चाहते जगभरात आहेत. पंजाबी गाण्यांची क्रेझ तर सर्वदूर पसरलेली आहे. सध्या सोशल मीडियावर सुपरहिट गायक दलेर मेहंदीच्या (Daler Mehndi) 'तुनक तुनक तुन' या गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल की यात विशेष काय? तर खास बात म्हणजे Tunak Tunak Tun वर डान्स करणारे हे युवक विदेशी आहेत. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

द विलियम्स फॅमिली नावाच्या एका पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पेजवर चार भाऊ त्यांचे डान्स व्हिडीओ पोस्ट करतात. या खास व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, 'हे गाणे खूप सही आहे. तुम्ही कधी ऐकले आहे का? यावरची कोरिओग्राफी नक्की शिका. बायोमध्ये लिंक दिली आहे. गाण्याचे नाव तुनक तुनक तुन आहे. जे गायक दलेर मेहंगी यांनी गायले आहे.'

(हे वाचा-'पिछे तो देखो...'म्हणणाऱ्या त्या Cute मुलाचा सोनूसाठी खास मेसेज, शेअर केला VIDEO)

तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिलात तर त्यावर थिरकावेसे तुम्हाला वाटेल. पाहा व्हिडीओ-

(हे वाचा-अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? अनपेक्षित VIDEO मुळे नेटकरी हैराण)

एक लाखापेक्षा अधिक लाइक्स व्हिडीओला मिळाले आहेत. तर Views लाखोंच्या घरात आहेत. भारतीय युजर्समध्ये हा व्हिडीओ विशेष लोकप्रिय होत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 3, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading