Home /News /viral /

अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? व्हायरल VIDEOमधील अनपेक्षित ट्विस्टमुळे नेटकरी हैराण

अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? व्हायरल VIDEOमधील अनपेक्षित ट्विस्टमुळे नेटकरी हैराण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अनपेक्षित ट्विस्ट पाहालया मिळत असल्यामुळे नेटकरी हैराण झाले आहेत.

  मुंबई, 02 ऑक्टोबर : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी कधीकधी विचित्र असतात, कधी कधी अनपेक्षित असतात. काही वेळासाठी डोक्याला मुंग्या आणणाऱ्या देखील असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. तुम्ही विचार करा जर एखाद्या अंड्यावर हातोडा पडला तर काय होईल? सर्वच जण अंड फुटेल असंच उत्तर देतील. मात्र या व्हिडीओमध्ये काहीसं उलटंचं पाहायला मिळतं आहे. या व्हिडीओमध्ये एक अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतो आहे, ज्यामुळे नेटकरी हैराण झाले आहेत. Satisfyingxtimes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा होते आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. पाहा नेमकं अंड्यावर हातोडा पडल्यानंतर काय होतं-
  View this post on Instagram

  Unbreakable egg🍳🍳🍳 🎥 @francomelanieh

  A post shared by Satisfying Posts 💖 (@satisfyingxtimes) on

  या व्हिडीओमध्ये हातोडा पडल्यावर अंडं फुटण्याऐवजी हातोडाच पूर्णपणे तुटून जातो. अगदी त्याचे तुकडे तुकडे होतात. असा ट्विस्ट युजर्सना अपेक्षित नसल्यामुळे थक्क झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. (हे वाचा-सिंग्नल तोडून हवेत उडाली गाडी, तीन वेळा आपटून रस्त्यावर आदळली; पाहा VIDEO) हा व्हिडीओ आतापर्यंत 70 हजारहून अधिक जणांनी लाइक केला आहे. तर शेकडो कमेंट्स यावर आल्या आहेत. Satisfyingxtimes या इन्स्टा पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान या युजरच्या नावाप्रमाणे हा व्हिडीओ अजिबात सॅटिसफाइंग नसल्याची प्रतिक्रिया काही युजरनी दिली आहे. तर सर्वच युजर हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Social media viral, Viral video.

  पुढील बातम्या