'पिछे तो देखो...' म्हणणाऱ्या त्या Cute मुलाचा सोनू सूदसाठी खास मेसेज, शेअर केला नवा VIDEO

'पिछे तो देखो...' म्हणणाऱ्या त्या Cute मुलाचा सोनू सूदसाठी खास मेसेज, शेअर केला नवा VIDEO

देशभरामध्ये चाहते सोनू सूदने (Sonu Sood) केलेल्या कामामुळे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतानाच त्याच्या एका क्यूट चाहत्याने देखील सोनूसाठी खास मेसेज एका व्हिडीओच्या माध्यमातून पाठवला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) लॉकडाऊन काळात अनेकांना मदत केली. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना गावी पोहोचवण्यापासून ते मुंबई पोलिसांना फेस मास्क शील्ड डोनेट करण्यापर्यंत अनेक कामात सोनू सूदने हातभार लावला. सर्वच स्तरातून त्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान देशभरामध्ये त्याचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतानाच त्याच्या एका क्यूट चाहत्याने देखील सोनूसाठी खास मेसेज एका व्हिडीओच्या माध्यमातून पाठवला आहे.

हा क्यूट व्हिडीओ पाठवणारा चिमुकला चाहता पाकिस्तानमधील आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी वयात त्याचे स्वत:चे देखील जगभरात लाखो चाहते आहेत. सोनूचा हा क्यूट फॅन दुसरा तिसरा कुणी नसून अहमद शाह (Ahmed Shah) आहे. अहमदचे सोशल मीडियावर खूप व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

अहमद शाह (Ahmed Shah) ने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, 'हेलो सोनू सूद सर, तुम्ही कसे आहात, ठीक आहात? मी देखील ठीक आहे. मी अहमद शाह आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप सारे प्रेम. तुम्ही खूप चांगले काम करत आहात. आय लव्ह यू. खूश राहा.'

View this post on Instagram

Cute love Message from little Angels Ahmad shah nd Umer for @sonu_sood Sir ❤❤

A post shared by Peer Ahmad Shah (@cuteahmadshah01) on

जेवढं प्रेम त्याला पाकिस्तानातून मिळतं आहे तेवढचं प्रेम त्याला भारतातून देखील मिळतं. आता त्याने सोनू सूदबाबत पोस्ट केलेला व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनूच्या कामाबाबत त्याने त्याचे कौतुक केले आहे. अहमदचा पहिला व्हिडीओ तेव्हा व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या स्कूल टीचरना धमकावत होता. मस्ती करणाऱ्या या मुलाकडून त्याची बॅग काढून घेतल्यावर अहमदला राग आला होता. अहमदचा हा अंदाज इतका क्यूट होता की त्याच्या शिक्षकाने त्याचा व्हिडीओ केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला होता.

(हे वाचा-नोरा फतेहीने का सोडला इंडियाज बेस्ट डान्सर शो? वाचा काय आहे कारण)

'पिछे तो देखो...' हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्यावर आजवर अनेक मीम्स देखील बनवण्यात आले आहेत. त्यानंतर अहमद शाहचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्या भाषेतील गोडी, त्याच्या Cuteness सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस पडतो. सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जाते.

(हे वाचा-या महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती)

आता अहमद शाहचे मोठे फॅन फॉलोइंग तयार झाले आहे. अनेक कार्यक्रमात देखील तो दिसतो. सोशल मीडियावर चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ देखील पोस्ट करत असतो. मात्र त्याच्या सोनू सूद बद्दलच्या व्हिडीओने भारतात विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 2, 2020, 4:19 PM IST

ताज्या बातम्या