नवी दिल्ली 26 मार्च : जगात लाखो लोक सरकारी नोकरी करतात. पण सरकारप्रती कर्तव्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणा दाखवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. खूप कमी लोक आहेत जे आपल्या कामालाच पहिली प्राथमिकता देतात आणि त्यात कसलाही दोष नसावा यासाठी ते मेहनत घेतात. जे असं करतात ते यशस्वी होतात, आणि त्यांचं कौतुक नक्कीच होतं. जग त्यांचा आदरही करतं. अशाच एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याचं मंत्रालयातूनच कौतुक होत आहे. जिने विभागाला करोडोंचा नफा कमावून दिला आहे.
रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट @RailMinIndia वर महिला तिकीट तपासनीस श्रीमती रोजलिन अरोकिया मेरी यांचं कौतुक केलं. ज्यांनी प्रवाशांकडून ₹1 कोटी दंड वसूल करून अनोखा विक्रम केला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचं खूप कौतुक होत असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ISROने घडवला इतिहास, सर्वात मोठ्या रॉकेटमधून 36 उपग्रहांचे प्रक्षेपण; पाहा VIDEO
भारतात विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या किंवा इतर कोणत्याही क्लासचे तिकीट घेऊन दुसऱ्याच क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. कमी अंतराच्या प्रवासात तर बरेच लोक तिकिट न घेताच बसतात किंवा टीटीला लाच देऊन प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत एका महिला तिकीट तपासकाने आपल्या प्रामाणिकपणाने आणि कर्तव्यदक्षतेने रेल्वेला करोडोंचा नफा मिळवून देऊन विक्रम केला आहे.
या महिला तिकीट तपासकाने प्रवासादरम्यान गडबड करणाऱ्या प्रवाशांकडून ₹ 1 कोटी दंड वसूल केला आहे. आजपर्यंत एकाही महिला कामगाराने हा विक्रम केला नव्हता. त्यामुळे या यशाबद्दल खुद्द रेल्वे मंत्रालयाने महिलेचं कौतुक केलं आणि तिचे फोटो अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
महिला तिकीट तपासनीस रोस्लिन अरोकिया मेरीची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं- 'कर्तव्याप्रती दृढ वचनबद्धता दाखवत @GMSRailway's च्या सीटीआय म्हणजेच मुख्य तिकीट निरीक्षक श्रीमती रोझलिन अरोकिया मेरी भारतीय तिकिट तपासणारी पहिली महिला बनली आहे, ज्यांनी अनियमित तिकिट असलेल्या प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोस्टवर कमेंट करत लोक रोजलीन यांचे अभिनंदन करत आहेत आणि अशाच सरकारी कर्मचार्यांची मागणी करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं - आपल्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी अशाच आव्हानात्मक आणि समर्पित महिलांची गरज आहे. अभिनंदन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Ticket