मराठी बातम्या /बातम्या /देश /ISROने घडवला इतिहास, सर्वात मोठ्या रॉकेटमधून 36 उपग्रहांचे प्रक्षेपण; पाहा VIDEO

ISROने घडवला इतिहास, सर्वात मोठ्या रॉकेटमधून 36 उपग्रहांचे प्रक्षेपण; पाहा VIDEO

isro

isro

रविवारी सकाळी नऊ वाजता श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 हे रॉकेट लाँच करण्यात आले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

चेन्नई, 26 मार्च : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सर्वात मोठं LVM3 रॉकेटमधून वनवेबचे ३६ सॅटेलाइट अंतराळात यशस्वीपणे सोडले. रविवारी सकाळी नऊ वाजता श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे रॉकेट लाँच करण्यात आले. ब्रिटनची नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेड (वनवेब ग्रुप कंपनी)ने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ७२ सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोच्या कमर्शियल युनिट न्यूस्पेस इंडिया लिमिटेड सोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत ३६ उपग्रह अंतराळात सोडण्यात येत आहेत.

इस्रोने शनिवारी म्हटलं होतं की, 'LVM3 वनवेब इंडिया २ मिशनचे काउंटडाउन सुरू झाले आहे." चेन्नईपासून १३५ किमी दूर असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात दुसऱ्या लाँच पॅडवरून २६ मार्चला सकाळी नऊ वाजता ४३.५ मीटर लांब रॉकेटमधून उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

आज प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३६ उपग्रहांसह आता पृथ्वीच्या कक्षेत सोडलेल्या वनवेबच्या उपग्रहांची संख्या ६१६ झाली आहे. जागतिक सेवा सुरू करण्यासाठी इतके उपग्रह पुरेसे असल्याचं वनवेबने म्हटलं होतं. आतापर्यंत एकूण १८ वेळा ग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

याआधी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी वनवेब ग्रुप कंपनीसाठी पहिले ३६ उपग्रह अंतराळात सोडले होते. इस्रोला या लाँचिंगसाठी १ हजार कोटी रुपये इतके शुल्क मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Isro