मुंबई २२ नोव्हेंबर : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना चांगली सर्विस देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. प्रवाशी देखील रेल्वेवर तितका विश्वास दाखवतात आणि प्रवास अगदी लांबचा असू देत किंवा जवळचा लोक रेल्वेचाच प्रवास सुखकर मानतात. हा प्रवास कमी खर्चीक तसेच सगळ्या श्रेणीतील लोकांच्या खिशाला परवडनारा असतो. शिवाय लोक निश्चित वेळेत आपल्या ठरावीक ठिकाणावर पोहोचतात.
भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा रेल्वे नेटवर्क मानला जातो. दर सेकंदाला शेकडो गाड्या रुळांवर धावतात. लांब पल्याच्याच नाहीत तर अगदी लोकल ट्रेन सुद्धा प्रवाशांसाठी जीवन वाहिनी आहेत. एक दिवस जरी ट्रेन बंद किंवा उशीरा असली तरी देखील लोकांची तारांबळ उडते.
आयुष्यात इतक्या महत्वाच्या असलेल्या या ट्रेनबद्दल तुम्हाला काही फॅक्ट्स माहितीयत?
रेल्वे स्थानकावर अनेक ट्रॅक असल्याचे तुम्ही पाहिले असेल. तुम्ही अनेकदा प्लॅटफॉर्मवरती अनाउसमेंट होताना देखील ऐकलं असेल की ही अमुक-अमुक ट्रेन आज या प्लॅटफॉर्मवर येणार आहे वैगरे....
पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की ही ट्रेन ट्रॅक किंवा रेल्वे रुळ कशी बदलते? यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
Indian Railway Intresting Facts
ट्रेनचा ट्रॅक कसा बदलतो किंवा ती कशी वळते हे जाणून घेण्यासाठी आधी ट्रेन कशी धावते हे जाणून घ्यावे लागेल? ट्रेन आतून ट्रॅकला धरून चालते, म्हणजेच ट्रेनचे टायर रुळावर लावले जातात. टायरमधील ट्रेडचा आतील भाग मोठा असतो, ज्यामुळे ट्रेनच्या चाकांना घट्ट ठेवण्यास मदत होते.
यामुळे होतं काय की, ट्रेनचा ट्रॅक ज्या प्रकारे राहतो, त्याच पद्धतीने ट्रेन पुढे सरकत जाते. म्हणजेच सगळ ट्रॅकवर सरळ धावते आणि ट्रॅक टर्न झाले की आपोआपच त्यासोबत टर्न होते.
आता प्रश्न असा आहे की ती ट्रॅक कशी बदलते?
आता तुम्ही पाहिलं असेल की रेल्वे ट्रॅक जेथे बदलतो, तेथे तुम्हाला एक वेगळी लोखंडी पट्टी दिसेल. तसेच ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त ट्रॅक्स बदलले जातात, त्या ठिकाणी तुम्हाला अगदी या लोखंडी पट्ट्यांचं जाळं दिसेल. आता ही लावलेली लोखंडी पट्टी तिच्या टोकाला निमूळती असते जी ट्रेनच्या मुख्य ट्रॅकला जोडील गेलेली असते आणि थोडी ती टर्न देखील झालेली असते.
अशावेळेस ट्रेनला जेव्हा ट्रॅक बदलायचा असतो, तेव्हा ट्रेनचा स्पीड कमी होतो आणि ती हलकी टर्न व्हायला सुरुवात करते. अशा प्रकारे ट्रेन हळूहळू दुसऱ्या ट्रॅकवर पोहोचते.
ही लोखंडी पट्टी म्हणजे लॉक चावीसारखा ट्रॅक आहे, जो बाजूला चिकटवला जातो आणि यामुळे ट्रॅकची दिशा बदलते आणि ट्रेन दुसऱ्या बाजूला वळते. हा एक प्रकारे ऍडजस्टेबल ट्रॅक आहे, जे ट्रेनला दिशा देण्याचे काम करतो.
मग आता आणखी एक प्रश्न उपस्थीत राहातो की हे होतं कसं किंवा हे सगळं कोण करतं?
ट्रॅक बदलण्यासाठी ट्रॅकमध्ये ऍडजस्टेबल ट्रॅक असतो, मात्र तो ट्रेनच्या रुटनुसार बदलावा लागतो. पूर्वी हे काम रेल्वे कर्मचारी करत असत आणि ते दिवसभर हाताने बदलत असत. मात्र, आता असे होत नाही. आजच्या काळात हे काम यंत्राद्वारे केले जाते. सिग्नल आणि मार्गानुसार यंत्र ते जुळवून घेते आणि त्यानुसार ट्रेनला दिशा मिळते आणि ती वळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Social media, Top trending, Train