मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : ट्रेनमध्ये सिगारेट ओढत होती तरुणी तरुणी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक

Video : ट्रेनमध्ये सिगारेट ओढत होती तरुणी तरुणी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 फेब्रुवारी : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आपण मनोरंजनासाठी करतो. पण याचा वापर आपण माहिती मिळवणे आणि आपलं मत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील करु शकतो. यामुळे लोकांमध्ये जागृक्ता देखील वाढते. एका व्यक्तीने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो त्याच्या रेल्वे प्रवासातील आहे.

रेल्वे प्रवास करताना त्याला झालेल्या त्रासाचा आणि समोरील व्यक्तीने नियम तोडल्याचा हा व्हिडीओ साक्ष देत आहे.

ट्रकमध्ये अडकलेल्या स्कुटीसोबत चिमुकल्याला 2KM पर्यंत फरफटत नेलं, Video पाहून उडेल थरकाप

आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेने प्रवास केलाच असेल. हा प्रवास कमी खर्चीक आणि सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो. लाखो लोक ट्रेनने दररोज प्रवास करतात. पण रेल्वेने प्रवास करण्याचे देखील काही नियम आहेत, जे सगळ्यांना पाळणे बंधन कारक आहे. कारण हे नियम सर्वच प्रवाशांच्या सोयीचे आणि फायद्याचे असतात.

त्यांपैकी एक नियम असा की रेल्वेने प्रवास करताना सिगरेट आणि दारु पिण्यावर बंदी आहे. पण असं असलं तरी देखील काही लोक या सगळ्या प्रकाराला न जुमानता आपल्या मनासारखं वागतात, ज्याचा इतरांना त्रास होऊ शकतो.

एक तरुणी ट्रेनमध्ये गांजा आणि सिगारेट ओढत आहे. ज्याचा प्रवाशांना त्रास होत आहे, म्हणून मग या व्यक्तीने हा सगळाप्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला आणि ट्विटरवर शअर केला आहे. प्रवाशाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "तरुणी आसनसोल येथे ट्रेनमध्ये चढली आणि संपूर्ण रात्र गांजा आणि सिगारेट ओढण्यात घालवली." त्यांच्या ट्विटला उत्तर म्हणून रेल्वे सेवेने प्रवासाबाबत अधिक तपशील मागितला.

तक्रारीनंतर रेल्वेने हे ट्विट केले आहे

रेल्वे सेवेने त्यांच्या गैरसोयीला प्रतिसाद दिला आणि म्हटले, "सर, आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया प्रवासाचे तपशील (PNR/ट्रेन क्रमांक) आणि मोबाइल नंबर आमच्याशी DM द्वारे शेअर करा. तुम्ही थेट http://railmadad.indianrailways ला भेट देऊ शकता. तुमची चिंता .gov.in वर नोंदवा किंवा जलद निवारणासाठी 139 डायल करा."

जर तुम्ही ट्रेनमध्ये धूम्रपान करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण केवळ दंडच नाही तर तुरुंगात जाण्याचीही शक्यता आहे. भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये धुम्रपान करताना पकडलेल्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे, ज्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे कायद्याचे कलम 167 निर्दिष्ट करते की सहप्रवाशाच्या मनाई किंवा आक्षेप असूनही डब्यात धूम्रपान करताना आढळल्यास ₹100 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral