जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Indian Railway Facts : प्लॅटफॉर्मजवळ पोहोचलेल्या ट्रेनला देखील सिग्नलला का थांबवलं जातं?

Indian Railway Facts : प्लॅटफॉर्मजवळ पोहोचलेल्या ट्रेनला देखील सिग्नलला का थांबवलं जातं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ट्रेन स्टेशनच्या एवढ्या जवळ आली असताना तिला का थांबवलं जातं? ट्रेनला स्टेशनवरच आणून उभी का केली जात नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी : भारतीय रेल्वेने तसेच लोकलने तुम्ही अनेकवेळा प्रवास केला असेल. हा प्रवास कमी खर्चीक आणि वेळेवर पोहोचवणारा असतो. ज्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळेच लोक याने प्रवास करतात. पण ट्रेन संदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ट्रेनने नेहमी प्रवास करणाऱ्या लोकांना देखील ठावूक नसतील. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात, परंतु या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही. आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित अशीच एक मजेदार गोष्ट सांगणार आहोत. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनेकदा याचा अनुभव घेतला असेल. अनेक वेळा गाड्या स्टेशनच्या काही अंतरावर पोहोचल्यावर त्याला सिग्नल लागतो किंवा त्या बराच वेळ उभ्या केल्या जातात, याला ‘आउटर’ असं म्हणतात. ट्रेनची साखळी ओढल्यावर ती कशी थांबते? ती कोणी ओढली हे पोलिसांनी कसं कळतं? मग आता प्रश्न हा उभा रहातो की ट्रेन स्टेशनच्या एवढ्या जवळ आली असताना तिला का थांबवलं जातं? ट्रेनला स्टेशनवरच आणून उभी का केली जात नाही. बऱ्याचदा आपल्याला समोरी स्टेशन दिसत असतं, जिथे आपल्याला एकही ट्रेन आलेली दिसत नाही, पण तरी देखील त्या ट्रेनला थांबवलं जातं, अशावेळी प्रवाशांना फारच राग येतो आणि मनात विचार येतो की जर ट्रेन नाही मग का थांबवलं किंवा पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबली असेल, पण या स्टेशनवर तर नाही ना, मग प्लॅटफॉर्मवर थांबवायला काय हरकत आहे? पण या गोष्टी आपण विचार करतो तितक्या साध्या आणि सरळ नसतात. ट्रेनला प्लॅटफॉर्म ठरवून दिले जातात. पण असं असलं तरी देखील काहीवेळेला शेवटच्या क्षणी काही परिस्थीतीमुळे ट्रेनचे प्लॅटफॉर्म बदलते किंवा काही वेळेला तुमच्या ट्रेनच्या येणाऱ्या ट्रेनला त्या प्लॅटफॉर्मवर थांबवण्याची गरज असते. त्यामुळे या सगळ्याचे निर्णय स्टेशन मास्टर घेतात आणि ते त्यामुळेच काहीवेळेला ट्रेन प्लॅटफॉर्मच्या जवळ आली असली तरी थांबवतात आणि दुसऱ्या ट्रेनला प्राधान्य देतात. हे फक्त लोकल ट्रेनच्या बाबतीतच नाही तर एक्स्प्रेस गाड्यांसोबत देखील घडतं. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 किंवा अधिक गाड्या एकाच वेळी आल्याने हे घडते. गाड्यांनी बहुतेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म निश्चित केले आहेत जेणेकरून लोकांना त्यांचा जास्त शोध घ्यावा लागणार नाही. परंतु कधीकधी परिस्थितीनुसार सगळे बदल होतात. अशावेळी कोणत्या गाड्यांना थांबवायचं आणि कोणत्या गाड्यांना येऊ द्यायचं याचा निर्णय स्टेशन मॅनेजरचा असतो. या सगळ्यात गाडीचा लोको पायलट काहीही करू शकत नाही. कोणती ट्रेन उशिराने किंवा वेळेवर धावत आहे, हे पाहून या आधारावरच स्थानक व्यवस्थापक हा निर्णय घेतात.

News18लोकमत
News18लोकमत

समजा आधीच एखाद्या ट्रेनला उशीर झाला असेल, तर मग अशावेळी अशा ट्रेनला थांबवून कधीकधी वेळेवर धावणाऱ्या ट्रेनला रस्ता मोकळा करुन दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे राजधानी आणि शताब्दीची सारख्या फास्ट ट्रेनला सर्वात आधी जागा मोकळी करुन दिली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात