मुंबई, 26 फेब्रुवारी : आपातकालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक डब्यात साखळी लावलेली असते आणि वेळप्रसंगी आपल्यला ती साखळी खेचायची असते हे तर सगळ्यांना माहितच आहे. पण ही साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते आणि पोलिसांना कसं समजतं की कुठे आणि कोणी साखळी ओढली आहे? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडला असेल. पण याचं उत्तर मात्र फार कमी लोकांना माहित असेल. चला मग अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ या की, साखळी ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते आणि ट्रेनच्या कोणत्या डब्यातून साखळी ओढली गेली हे पोलिसांना कसं कळतं. महिलांनी नारळ का फोडू नये? हिंदू धर्माचे हे नियम माहितीयत का? साखळी ओढल्यावर ट्रेन का थांबते हे जाणून घेण्यापूर्वी, ट्रेनमध्ये ब्रेक कसे लावले जातात हे जाणून घेणे आवश्यक आहे. खरे तर ट्रेनचे ब्रेक नेहमीच लावलेले असतात. फक्त जेव्हा ट्रेन हलवायची असते तेव्हा हे ब्रेक काढले जातात. ब्रेक काढल्यानंतरच ट्रेन पुढे सरकते. जेव्हा लोको पायलटला ट्रेन सुरु करायची असते तेव्हा तो हवेच्या दाबाने ब्रेकला टायरपासून दूर ठेवतो. तसेच जेव्हा ट्रेन थांबवायची असते तेव्हा ते ब्रेकला एअर किंवा हवा देणं बंद करतात. ज्यामुळे ट्रेनला ब्रेक लागतात आणि ट्रेन थांबते. साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? ट्रेनच्या डब्यांमध्ये बसवण्यात आलेली अलार्म चेन ब्रेक पाईपला जोडलेली असते आणि ती ओढल्यावर ब्रेक पाईपमधून हवेचा दाब येतो आणि ट्रेन ब्रेक लावू लागते. यामुळे ब्रेक सिस्टममध्ये हवेचा दाब अचानक कमी होतो. यासाठी ड्रायव्हरला इंडिकेटर सिग्नल आणि हुटिंग सिग्नल मिळतो. ज्याद्वारे ड्रायवरला समजते की एकतर ट्रेनची साखळी ओढली गेली आहे किंवा ट्रेनच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे. त्यानंतर तो नेमकी कारणे शोधतो. मग आता प्रश्न असा की पोलिसांना हे कसं कळतं? चेन पुलर शोधण्यासाठी जुनी युक्ती वापरली जाते. खरं तर, ट्रेनच्या ज्या बोगीतून साखळी ओढली जाते, तिथून हवेचा दाब रिलीज झाल्याचा मोठा आवाज येतो. या आवाजाच्या मदतीने भारतीय रेल्वे पोलीस दल त्या बोगीपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर तिथे उपस्थित प्रवाशांच्या मदतीने साखळी ओढणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. जेव्हा व्हॅक्यूम ब्रेक ट्रेनमध्ये साखळी ओढली जाते, तेव्हा डब्याच्या वरच्या कोपऱ्यात एक व्हॉल्व्ह फिरतो, जो पाहून ट्रेनचा डबाही ओळखला जातो.
आता मग यापुढे जर तुम्ही कधी मुद्दा किंवा मजा म्हणून ट्रेनची साखळी खेचण्याचा विचार करत असाल, तर असं करु नका. कारण विना कारण ट्रेनची चैन खेचल्यामुळे तुम्हाला दंड लागू शकतो.