जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Railway Facts : ट्रेनच्या मागील बाजूला 'X' चिन्ह का असते?

Railway Facts : ट्रेनच्या मागील बाजूला 'X' चिन्ह का असते?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बहुतेक प्रवाशांनी ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ चिन्ह पाहिले असेल. परंतू याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसावा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 ऑक्टोबर : सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असावा. खरंतर भारतीय रेल्वे सगळ्या श्रेणीतील लोकांच्या खिशाला परवडेल अशीच आहे. त्यामुळे यामधून कोणीही प्रवास करु शकतो. तसेच ट्रेन आपल्याला ठरावीक वेळेत आपल्या स्थानकापर्यंत आपल्याला पोहोचवते. ज्यामुळे बरेचसे लोक लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेनचा पर्याय अवलंबतात. परंतू तुम्ही कधी रेल्वेने प्रवास करताना एक गोष्ट नोटीस केली आहे का? ट्रेनच्या शेवटच्या डब्या मागे ‘X’ चिन्ह मोठ्या आकारात लिहिलं जातं. पण हे असं का केलं जातं तुम्हाला माहितीय? चला जाणून घेऊया ट्रेनशी संबंधित अशाच काही गोष्टी. बहुतेक प्रवाशांनी ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ चिन्ह पाहिले असेल. परंतू याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. खरंतर ही खूण ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, प्रत्येक प्रवासी ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागील बाजूस हे चिन्ह असणे अनिवार्य आहे. हे ही वाचा : दिवाळीत साड्यांची खरेदी करताना फसवणूकीपासून वाचा; या Viral Video ने केली पोलखोल याशिवाय तुम्ही ट्रेनच्या डब्याच्या मागील बाजूस ‘LV’ लिहिलेलेही पाहिले असेल. त्याचा देखील एक अर्थ असतो. ‘X’ चिन्हाचा अर्थ काय? ट्रेनच्या डब्याच्या मागील बाजूस ‘X’ चिन्ह हा एक कोड आहे, जो सुरक्षिततेच्या उद्देशाने बनविला गेला आहे. जरी त्याचे अनेक अर्थ असू शकतात. जर ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे ‘X’ नसेल तर याचा अर्थ ट्रेनमध्ये काही समस्या आहे किंवा ट्रेन अर्धवट राहिली आहे. डब्याच्या मागे ‘एक्स’ दिसत नसल्यास रेल्वे कर्मचारी सतर्क होतात. तथापि, ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागील ‘X’ पाहून तुम्ही एक प्रवासी म्हणून समाधानी होऊ शकता की ट्रेनमध्ये सर्व काही ठीक आहे. हे ही वाचा : ‘देवाचे अन्न’ म्हणून इथे खाल्ली जाते किड्यांची अंडी, एका छोट्या बरणीची किंमत खूपच जास्त ‘LV’ म्हणजे काय? आम्ही तुम्हाला सांगतो की ‘X’ चिन्ह असलेला एक बोर्ड देखील आहे ज्यावर LV लिहिलेले आहे. LV म्हणजे शेवटचे वाहन. याचा अर्थ शेवटचा बॉक्स. ‘X’ चिन्ह असलेला LV रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचित करतो की तो ट्रेनचा शेवटचा डबा आहे. जर ट्रेनच्या शेवटच्या डब्यात LV दाखवला नसेल तर याचा अर्थ ती आपत्कालीन परिस्थिती आहे. LV दिसत नसल्यास, शेवटचा डबा ट्रेनशी जोडलेला नाही हे कळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात