मुंबई 15 ऑक्टोबर : साडी घालण्याची आवड प्रत्येक महिलेला असते. वेगवेगळ्या रंगाची, प्रकाराची साडी म्हणजे महिलांसाठी जीव की प्राण आहे. आपल्याकडे कितीही साड्या असला तरी देखील महिला नवनवीन साड्या विकत घेतच असतात. परंतू बऱ्याचदा महिलांची यामध्ये फसवणूक देखील होते. अनेकदा याकपड्याची साडी किंवा खऱ्या जरीची साडी असं सांगून दुकानदार महिलांकडून जास्त पैसे घेतात. परंतू त्याची सत्यता कशी पडताळायची हे अनेकांना माहित नसतं. पण काळजी करु नका आम्ही तुम्हाला अशी काही ट्रीक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सत्यता तपासू शकता. तसं पाहाता सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे येथे आपलं मनोरंजन होतं. तसेच हे माहिती देणारं एक चांगलं मीडियम आहे. ज्यामुळे आपल्याला इथे दररोजच्या जीवनाती काही टीप्स देखील मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर आपल्याला जरीच्या साडीवरील जरी खरी आहे की खोटी ही कसं तपासायचं यासाठी टीप दिली गेली आहे. हे ही पाहा : कधी पाहिलंय हत्तीला पाणीपूरी खाताना? हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल या व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे तुमच्याकडे एक दगड असणे गरजेचं आहे. पण हा दगड साधा दगड नाही तर तो कस्तूरी दगड आहे. हा दगड तुम्हाला साडीच्या जरीवर घासावा लागेल. जर या दगडावर कॉपर रंग आला तर याचा अर्थ तुमच्या साडीवर लावलेली जरी ही खोटी आहे. तसेच जर त्या कस्तुरी दगडाचा रंग सिल्वर म्हणजेच चंदेरी झाला कर समजा की तुमच्या साडीवरील जरी हे खरी आहे.
हा ट्रीक व्हिडीओ nilambaribanaras नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो खरोखरंच महिलांच्या कामाचा व्हिडीओ आहे. तुम्ही ही ट्रीक वापरुन खरं खोटं करु शकता. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. हे ही पाहा : साप मागे लागला म्हणून सैरावैरा पळू लागला तरुण, सत्य समोर आलं तेव्हा… पाहा Video हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना ‘खरी जरी ओळखण्याची परीक्षा’ असं कॅप्शन लिहिलं गेलं आहे. हा व्हिडीओ लोकांना देखील खूप आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि शेअर देखील केलं आहे. तसेच नेटकऱ्यांकडून यावर भरभरुन कमेंट्स देखील आल्या आहेत.