मराठी बातम्या /बातम्या /Viral /

महाराष्ट्रातील असं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन

महाराष्ट्रातील असं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तुम्हाला माहितीय का की, महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे. जेथे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन आहे, ज्याला वेगळी नावं देखील आहेत. याच कारणामुळे तेथे येणारे लोक नेहमीच गोंधळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 28 सप्टेंबर : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ट्रेनने प्रवास केलाच असणार. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक आणि वेळ वाचवणारा असतो, त्यामुळेच तर कोणत्याही श्रेणीतील लोक हे रेल्वेचा प्रवास स्वीकारतात. यामुळे तुम्ही तुमच्या ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळेत पोहोचू शकता. भारतीय रेल्वेचं नेटवर्क असं काही पसरलं आहे की अगदी लांबच्या प्रवासाठी देखील तुम्ही रेल्वेने प्रवास करु शकता.

पण तुम्हाला भारतीय रेल्वचे काही फॅक्टस माहितीय का? खरंतर आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा रेल्वेच्या एका स्थानकावर आपण उतरतो, त्या स्थानकाला एक ठराविक नाव असतं, ज्यामुळे आपल्याला त्या स्थानकाची ओळख पटवताना मदत मिळते.

पण तुम्हाला माहितीय का की, महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे. जेथे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन आहे, ज्याला वेगळी नावं देखील आहेत. याच कारणामुळे तेथे येणारे लोक नेहमीच गोंधळतात.

खरंतर महाराष्ट्रातील अहमदनगर येथे श्रीरामपूर आणि बेलापूर असे दोन स्टेशन आहेत, जे एकाच ठिकाणी आहेत.

तसेच या दोन्ही स्टेशनवर वेगवेगळी अनाउसमेंट देखील केली जाते.

हे वाचा : ''मैने पायल है छनकाई'' गाण्यावर सुंदर महिलेनं धरला ताल, डान्स असा की नेटकऱ्यांनाही लावलं वेड, पाहा VIDEO

यामुळेच तिकीट काढण्यापूर्वी कोणत्याही प्रवाशाला ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे नीट समजून घ्यावे लागते, कारण श्रीरामपूर आणि बेलापूर स्टेशन एकाच ठिकाणी आहेत.

यात फरक एवढाच आहे की ही दोन्ही स्थानके ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहेत. ज्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांचा गोंधळ उडतो.

हे वाचा : ट्रक झाला चालता फिरता लग्नमंडप, Video शेअर करण्यापासून आनंद महिंद्रा देखील स्वत:ला रोखू शकले नाही

पण तुम्हाला माहिती आहे का की एवढंच नाही तर महाराष्ट्रात असं एक प्लाटफॉर्म आहे जे अर्ध गुजरात आणि अर्ध महाराष्ट्रात येतं.

खरंतर हे नवापूर रेल्वे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. जेथे रेल्वे प्रवाशांना चार वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती दिली जाते. येथे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठीमध्ये अनाउसमेंट होतात.

First published:

Tags: Indian railway, Running local, Train