मुंबई 26 सप्टेंबर : बिझनेसमॅन आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ते नेहमीच चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत असतात. देशातील कोणत्याही व्यक्तीने जर उल्लेखनिय काम केलं असेल, तर ते त्याबद्दल शेअर करायला आणि त्याची प्रशंसा करायला कधीही विसरत नाहीत. सध्या त्यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर आनंद महेंद्रा यांनी स्वत: त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ कोणता आहे आणि त्यामध्ये काय खास आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुक्ता लागली आहे. नक्की असं काय आहे त्या व्हिडीओत? हे ही वाचा : महिलेच्या घरातील भिंतीतून बाहेर पडू लागलं रक्त, प्लंबरला बोलावताच समोर आलं धक्कादायक रहस्य आनंद महेंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा एका ट्रकचा आहे. जो चालता फिरता लग्न मंडप आहे… आता हे ऐकून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? मग सर्वात आधी हा व्हिडीओ पाहा
I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country pic.twitter.com/dyqWaUR810
— anand mahindra (@anandmahindra) September 25, 2022
या एका ट्रकमध्ये संपूर्ण मॅरेज हॉल सामावलेलं आहे. बघायला गेलं तर हा एक ट्रक आहे पण पाहिल्यावर म्हणाल की चालते फिरते लग्नघर आहे. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये २०० लोक आरामात येऊ शकतात. एका लहान व्हिडीओद्वारे एक लहान फंक्शन क्लिप देखील तुम्ही पाहू शकता की, हे ट्रकमधील लग्नमंडप नक्की कसं सेट केलं जातं आणि ते कसं दिसतं. हे ही वाचा : IAS Officer च्या दहावीची मार्कशिट का होतेय व्हायरल? ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा खरंतर या ट्रकमध्ये हे लग्न मंडप अशापद्धतीन बनवण्यात आलं आहे की अगदी कुठेही तुम्ही तो उभा करु शकता. अगदी या मंडपामध्ये एसी आणि लाईटची देखील सोय आहे, जे या मंडपाला प्राईम बनवत आहे. फक्त लग्नासाठीच नाही, तर तुम्ही या डेकोरेशनचा वाढदिवसाच्या पार्टीपासून ते इतर कोणत्याही मोठ्या कार्यासाठी वापरु शकता. ही कल्पना पाहून आनंद महिंद्राही प्रभावित झाले आणि त्यांनी ही संकल्पना सुचलेल्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. इतकेच नाही तर त्यांनी या व्यक्तीला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. आता लोक देखील या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक्त आहेत.