जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नोटीवरील लिहिलेल्या 'या' गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहितीय का?

नोटीवरील लिहिलेल्या 'या' गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहितीय का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आरबीआयलाच पैसे छापण्याची किंवा बनवण्याची परवानगी असते. त्यामुळे दुसरं कोणाही नोटा छापू शकत नाही आणि तसं करताना कोणी आढळलं तर त्याला शिक्षा देखील होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पैसा कोणाला नको असतो, तुम्ही श्रीमंतापासून ते गरीबाला विचारा प्रत्येकासाठी पैसा महत्वाचा असतो. कोणासाठी पोटाची भूक भागवण्यासाठी पैसा महत्वाचा असतो, तर कोणासाठी आपल्या चैनीच्या वस्तूंसाठी, तर कोणासाठी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा महत्वाचा असतो. आता हा पैसा येतो कुठून, तर सहाजिकच कमाई करुन, पण याला बनवतं कोण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. एक रुपयाची नोट वगळता सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची सही आहे. तसेच त्यावर अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात प्रत्येक नोटीवर त्याच्या मुल्या प्रमाणे पैसे लिहून मी ते देण्याचे वचन देतो असे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. मुंबईतील अशी ‘ही’ 5 ठिकाणं, जिथे एकटं जाण्याची चुक कोणीही करत नाही आरबीआयलाच पैसे छापण्याची किंवा बनवण्याची परवानगी असते. त्यामुळे दुसरं कोणाही नोटा छापू शकत नाही आणि तसं करताना कोणी आढळलं तर त्याला शिक्षा देखील होते. पण पैशाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहितीय का? यावर नोटीवर एक गोष्टी लिहिलेली तुम्ही पाहिली असेल ती म्हणजे. “मी धारकाला 100 किंवा 500 रुपये देण्याचे वचन देतो”. पण हे का लिहिलं जातं? किंवा ते लिहिण्या मागचं खरं कारण तुम्हाला माहितीय का? खरंतर ही आरबीआयच्या गव्हर्नरची शपथ आहे की, ज्याच्याकडे ही नोट आहे, त्याला या नोटीवर लिहिलेली किंमत देण्याची जबाबदारी आरबीआयच्या गव्हर्नरची आहे. चला भारतीय चलनाच्या इतिहासावर थोडी नजर टाकू भारताकडे स्वत:चे चलन छापण्याची जबाबदारी १९३५ पूर्वी दिली गेली. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली. ज्यानंतर या बँकेकडे नोटा जारी करण्याचे अधिकार दिले गेले. भारताच्या चलनी नोटांचा विकास भारतात नोटांची छपाई ही किमान राखीव प्रणालीच्या आधारे केली जाते. ही प्रणाली भारतात १९५७ पासून लागू आहे. यानुसार किमान 200 कोटी रुपयांची मालमत्ता आरबीआय फंडात कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेला अधिकार आहे. या 200 कोटींपैकी 115 कोटींचं सोनं आणि उर्वरित 85 कोटीची विदेशी मालमत्ता ठेवणं गरजेचं आहे. इतकी मालमत्ता ठेवल्यानंतर आरबीआय देशाच्या गरजेनुसार कितीही मोठ्या प्रमाणात नोटा छापू शकते, तरीही त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते.

News18लोकमत
News18लोकमत

“मी धारकाला १०/२०/१००/५०० रुपये देण्याचे वचन देतो याचा अर्थ काय आहे? कोणत्याही नोटेवर रिझर्व्ह बँक हे स्टेटमेंट छापते, कारण ती छापलेल्या रकमेचं सोनं राखून ठेवते. म्हणजेच जर तुमच्याकडे शंभर रुपयांची नोट असेल तर त्याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडे शंभर रुपयांचा सोन्याचा साठा आहे, हे धारकाला पटवून देण्यासाठी ती हे विधान लिहिते. त्याचप्रमाणे इतर नोटांच्याबाबतीत देखील आहे. तुमच्याकडे असलेल्या नोटेचे तुम्ही धारक आहात आणि तुमचे सोने त्याच्या किमतीएवढे रिझर्व्ह बँकेकडे ठेवले जाते आणि त्या नोटेच्या बदल्यात ते सोने तुम्हाला देण्यास रिझर्व्ह बँक कटिबद्ध आहे. म्हणून हे सगळं बँकेवर लिहिलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात