मुंबई : भूत, प्रेत आत्मा असं या जगात काहीही नसतं असं म्हणतात. अनेकदा वेगवेगळ्या रिसर्चमधून ही सिद्ध देखील केलं आहे. पण असं असलं तरी देखील अनेकांचा असा विश्वास आहे की भूत नावाचं गोष्ट अस्तित्वात आहे. लोक त्यांनी अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवरुन या सगळ्यावर विश्वास ठेवतात. जर देव आहे तर भूत देखील आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. या सगळ्यावर लोक आपल्याला जे पटतं त्यावर विश्वास ठेवतात.
आज आम्ही तुमच्यासमोर अशा काही जागांची नाव घेऊन आलो आहोत, ज्या मुंबईतील सर्वात हॉन्टेड जागा असल्याचे मानले जाते, स्थानिक लोक या जागेंबद्दल अनेक कहाण्या सांगतात. चला मग जाणून घेऊ त्या जागा ज्या आहेत हॉन्टेड जागांच्या यादीत.
कुत्रे का रडतात? खरं कारण ऐकाल तर विश्वास बसणार नाही
https://lokmat.news18.com/viral/why-dog-cry-at-night-is-dog-can-see-ghost-does-dog-cry-when-the-see-ghots-or-atma-kutre-ka-radtat-know-the-reason-mhds-837592.html
मुकेश मिल
मुंबईतील कोलाबा परिसरातील समुद्राच्या जवळ असलेली मुकेश मिल एक भितीदायक जागा असल्याचे सांगितले जाते.
लिस्ट
ही जागा ११ एकर परिसरात पसरली आहे. या जागाचं नाव जगातील टॉप १० सर्वात हॉन्टेड जागेमध्ये येते. इथे रात्रीच्या तसेच दिवसाच्या वेळी पॅरानॉमल अक्टिवीटी होत असतात असं म्हटलं जातं.
डिसूजा चाळ
ही मुंबईतील अशी चाळ आहे. जिथे रात्रीच्या वेळी महिला फिरत असल्याचा भास अनेकांना होतो. येथे एका महिलेने विहिरीत उडी मारुन जीव दिला होता. तेव्हापासून तिचा आत्मा इथे फिरतो असं तेथील लोक सांगतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथील लोक बाहेर फिरणं आणि त्या विहिरीजवळ जाणं टाळतात.
पवनहंस क्वाटर्स
हे देखील मुंबईतील सर्वात हॉन्टेट जागेपैकी एक आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की येथे एक भयानक आत्मा फिरत असते.
संजय गांधी नॅशनल पार्क
असं म्हटलं जातं की येथे एका महिलेचा आत्मा फिरत असतो. ज्यामुळे लोक रात्रीच्या वेळी येथे फिरणं टाळतात.
आरे मिल्क कॉलनी
या जागेचा देखील मुंबईतील सर्वात खतरनाक आणि हॉन्टेड जागांमध्ये समावेश आहे.
किवदंती
स्थानिय लोकांच्या सांगण्यानुसार येथे एक महिला लोकांकडून लिफ्ट मागते आणि मग त्यांचा पाठलाग कधीच सोडत नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी कुणी फिरकत नाही.
वरील गोष्टींची पुष्टी न्यूज १८ लोकमत करत नाही, ही माहिती सामान्य माहितीवर आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीवर आधारीत आहे. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Shocking, Social media, Top trending, Viral