अखंड प्रताप सिंग (कानपूर), 30 मार्च : उन्हाळा सुरू होताच लोक एसी आणि कुलरच्या शोधात असतात. सध्या लोक एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एसी बाहेरील हवा ओढून हवा देत असल्याने अनेक वेळा या हवेत व्हायरस आणि बॅक्टेरिया सोबत येण्याची भिती आपल्याला असते. यामुळे आपल्या जिवाला धोका पोहोचण्याची भिती असते. परंतु एका संशोधनात नवीन एसीचा शोध लागला आहे. आयआयटी कानपूरच्या इन्क्युबेटेड कंपनीने असा फिल्टर विकसित केला आहे, जो एसीमध्ये बसवल्यानंतर तुम्हाला बॅक्टेरिया आणि विषाणू मुक्त थंड हवा मिळणार आहे.
आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि इनक्यूबेटर डॉ. संदीप पाटील यांच्या कंपनीने हा फिल्टर तयार केला आहे. एसीमध्ये फिल्टर बसवल्याने हवा तर शुद्ध होईलच, शिवाय ती विषाणू आणि बॅक्टेरियापासूनही मुक्त होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फिल्टर एसीमध्ये बसवण्यात येणार आहे.
''मी बॉयफ्रेंडसोबतच रहाणार...'' लग्नानंतर नवऱ्यासमोर तरुणीचा ड्रामा
यानंतर, हवेतील सर्व विषाणू आणि बॅक्टेरिया एसीच्या आत गेल्यानंतर ते या फिल्टरद्वारे नष्ट होतील आणि आपल्याला शुद्ध आणि थंड हवा मिळेल.
डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, नॅनो पार्टिकल मेड फायबरपासून हे फिल्टर तयार करण्यात आले आहे. जे केवळ विषाणू आणि बॅक्टेरियाच थांबवत नाही तर त्यांना निष्क्रिय देखील करते. त्यांनी सांगितले की या फिल्टरची चाचणी भारत आणि अमेरिकेच्या प्रयोगशाळेत केली गेली आहे. जिथे ते 99 टक्के प्रभावी मानले गेले आहे.
घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य
या फिल्टरला स्वासा एअर फिल्टर असे नाव देण्यात आल्याचे डॉ.संदीप पाटील यांनी सांगितले. हे अँटी मायक्रोबियल आणि अँटीव्हायरल आहे. ते देशात आणि परदेशात सर्वत्र ऑफलाइन आणि ऑनलाइन व्यावसायिक वेबसाइटवर उपलब्ध झाले आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त 250 रुपयांना उपलब्ध असेल. एवढेच नाही तर ते ६ महिने पूर्ण दर्जासह काम करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur, Local18, Uttar pradesh news