मुंबई : लग्नानंतर नववधू आणि नवरदेव नव्या संसाराची सुरुवात करतात. दोघेही आनंदात राहावे असं त्यांच्या कुटुंबाची देखील इच्छा असते. लग्नानंतर नववधू आणि नवरदेव अनेक स्वप्न रंगवतात. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच नववधू संसार सोडून पळून गेली तर? विचार करा की त्या नवरदेवाचं काय होईल? असाच काहीसा प्रकार उत्तराखंडच्या राजधानीमधून समोर आला आहे. येथे फेब्रुवारी महिन्या एका तरुणीचे लग्न झाले होते. ती सासरी देखील गेली काही दिवस ती आपल्या नवऱ्यासोबत राहिली देखील, मात्र अचानक तिने आपल्या नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेतला. घराच्या बाहेर दररोज यायचा विचित्र वास, CCTV तपासताच समोर आलं धक्कादायक सत्य उत्तराखंडच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात येथे एका मुलीचे लग्न झाले. त्यावेळी निरोप घेऊन ती सासरी गेली, मात्र काही दिवस उलटताच तिने पतीला सोडून प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट धरला. सासरच्या मंडळींनी नवविवाहित महिलेच्या कुटुंबीयांना बोलावून समजावून सांगितले, मात्र आई-वडिलांकडून तिला मारले जाईल या भीतीने तिने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली. सासरच्या मंडळींनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मानलीच नाही. मंगळवारी त्याने नेहाच्या कुटुंबीयांना घरी बोलावले. मामानेही नेहाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला सोबत घेऊन जायचे पण तिने घरातील लोक तिला मारून टाकतील असे सांगून त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.
कँट पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांशी बोलून नवविवाहित महिलेला तिच्या सासरच्या घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणावर काही तोडगा निघेल की नाही, याबाबत स्पष्टता नाही.