मुंबई, 17 एप्रिल : भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहातात, त्यामुळे प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा आणि रुढी पाळल्या जातात आणि त्यांचे महत्व देखील वेगळे आहे. लग्नाच्या पद्धती देखील वेगवेगळ्या भागात भिन्न आहेत. पण असं असलं तरी हिंदू धर्मात सिंदूर (कुंकु) आणि मंगळसुत्राला महत्व आहे. फक्त वेगवेगळ्या भागात त्याचे डिझाइन आणि इतिहास वेगळा आहे. आज आपण साऊथ स्टाईल मंगळसुत्र , त्याचा इतिहास आणि त्याच्या डिझाइन्सच्या महत्वाबद्दल बोलणार आहोत.
महाराष्ट्रीयन मंगळसूत्रांच्या डिझाईन्सप्रमाणेच दाक्षिणात्य मंगळसूत्र हे वेगळे असतात. (South Indian Mangalsutra दाक्षिणात्य मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा उपयोग केला जात नाही. दाक्षिणात्य किंवा साउथ इंडियन लोक यांच्याकडे सोन्याला जास्त मान आहे. त्यामुळे हे लोक संपूर्ण सोन्याचंच मंगळसुत्र वापरतात. त्यांचं मंगळसुत्र हे सोन्याच्या चैनीत बनवलं जातं. शिवाय त्याच्या पेंडंटचं डिझाईन हे टेंपल ज्वेलरीप्रमाणे दिसते. ज्यामध्ये देव, देवी यांचे फोटो किंवा आकृती तयार केली जाते. शिवाय चैनीचे देखील अनेक डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. दाक्षिणात्य भागात मंगळसूत्राला काय म्हणतात? वेगवेगळ्या राज्या मंगळसूत्राला वेगवेगळ्या नावाने आणि डिझाइनने ओळखत येते. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये मंगळसूत्राला थाली, बुट्टू, मिन्नु इत्यादी नावाने संबोधले जाते. ‘मंगळसूत्र’ घालण्याची प्रथा कशी सुरु झाली?
दक्षिणात्य मंगळसूत्राचे महत्त्व
तामिळनाडूमध्ये मंगळसूत्राला थाली असे म्हटले जाते, ते वेगवेगळ्या आकारात येते. वेगवेगळ्या आकारातील या मंगळसूत्राचे महत्त्वही वेगवेगळे आहे. मुलगा आणि मुलीच्या जाती आणि पोटजातीनुसार हे मंगळसूत्र निवडण्यात येते सोन्याची चैन अथवा पिवळा धागा घेतला जातो, ज्याला थाली मंगळसूत्र घातले जाते. या मंगळसूत्रात जे पेंडंट असते, त्यामध्ये देवी मीनाक्षी, सुंदरेश्वर देव, तुळशीचे रोपटे आणि शिवशंकराची प्रतिमा बनविण्यात येते. तसंच या मंगळसूत्रामध्ये देवाच्या प्रतिमेसह सोन्याचे नाणे, कोरल, बुट्टू इत्यादीदेखील गुंफले जाते. इतकंच नाही तर या मंगळसूत्रात हळदीच्या गाठीचाही उपयोग करण्यात येतो. हे मंगळसूत्र मुलाच्या घरातून मुलीसाठी आणण्यात येते. तसेच तामिळ लग्नामध्ये एक वेगळी रीत असते. मंगळसूत्र गळ्यात बांधताना त्यामध्ये 3 गाठ बांधण्यात येतात. लग्नानंतर काही दिवसांनी मंगळसूत्रातील पिवळा दोरा काढून चैनमध्ये त्याला टाकले जाते. मंगळसूत्रामध्ये असलेले पेंडंट हे वेगवेगळ्या गोष्टी दर्शविते. भगवान शिवाचे लिंग हे फर्टिलिटीचे प्रतीक असून तुळशीचे रोपटे हे शुद्धतेचे प्रतीक मानण्यात येते.