महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये मंगळसुत्र हा अलंकार विशेष प्रचलित आहे. विवाहित स्त्रीया ते आवर्जून घालतात. अगदी 'साधे मंगळसूत्र' म्हणजे दोऱ्यात ओवलेली काचेच्या काळ्या मण्यांची दोन पदरी माळ होय. माळेच्या मध्यभागी बहुधा सोन्याचे चार गोल मणी व सोन्याच्या दोन लहान वाट्या बसवलेल्या असतात.