नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : जगभरात अनेक लोक असे असतात ज्यांना चविष्ट पदार्थांसोबत (Tasty Food) अनेक प्रयोग करायला आवडतात. अनेकदा या वेगळ्या प्रयोगांमुळे हा पदार्थ अधिकच चविष्ट बनतो तर अनेकदा हा प्रयोग पूर्णतः फसतो. सध्या अशाच एका नव्या पदार्थावर करण्यात आलेला प्रयोग चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होणारी ही डिश (Weird Dish Viral) पाहून लोक हैराण झाले आहेत. PHOTOS: शेतकऱ्याच्या मुलाने लावला चहाचा स्टॉल; आता 22 शहारांमध्ये घालतोय धुमाकूळ तुम्ही बटाटा, पनीर, चिकन हे पदार्थ वापरून डोसा बनवल्याचं अनेकदा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला डोशामध्ये आईस्क्रीन टाकल्याचं पाहिलंय का ? सध्या जो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, त्यात दिसतं की एक व्यक्ती डोशामध्ये आईस्क्रीम आणि डेरी मिल्क (Ice cream and Chocolate Dosa) टाकत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दुकानदार डोशाचं बॅटर आधी तव्यावर टाकतो. हे तो अगदी व्यवस्थितपणे तव्यावर पसरवतो. यानंतर तो यावर आईस्क्रीम आणि चॉकलेट सिरप टाकतो. यानंतर तो डेअरी मिल्क चॉकलेट बारीक करून डोशावर टाकतो. थोड्या वेळानंतर तो या डोशाचे छोटे पीस करून ते ग्राहकांना देतो.
@mayursejpal 😡 pic.twitter.com/FNFOL4Hyen
— vijay sheth (@vijaysheth) October 12, 2021
हा व्हिडिओ ट्विटरवर @vijaysheth नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यासोबत रागातील इमोजीही पोस्ट केला गेला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला राग कमेंटमध्ये व्यक्त करत आहेत. असं काय झालं की रामलीलेतला ‘रावण’ सगळं सोडून भांगडा करायला लागला, पाहा VIDEO एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, आईस्क्रीम, चॉकलेट आणि डोसा…तिन्हींसोबत अत्याचार आहे. दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, कुठून येतात असे लोक. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं, चवदार पदार्थांसोबत असं नाही करायला पाहिजे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.