मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बिच्चारा! बायकोसोबत असं काही करायला गेला की स्वतःच फसला नवरा; पाहा VIDEO

बिच्चारा! बायकोसोबत असं काही करायला गेला की स्वतःच फसला नवरा; पाहा VIDEO

Husband wife funny video : नवऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटला.

Husband wife funny video : नवऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटला.

Husband wife funny video : नवऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 डिसेंबर : नवरा-बायकोची (Husband wife) भांडणं काही नवी नाहीत. सोशल मीडियावरही नवरा-बायकोच्या भांडणाचे (Husband wife funny video) असे बरेच मजेशीर व्हिडीओही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात नवरा आपल्या बायकोसोबत असं काही करायला गेला तो स्वतःच फसला (Husband wife viral video). त्यावेळी असं काही झालं की बाजीच उलटली. नवऱ्याने ठरवलं एक होतं आणि झालं भलतंच (Couple funny video).

नवरा आपल्या बायकोला मारायला जातो पण आपल्या प्लॅन आपल्यावरच उलटणार याचा बिचाऱ्याने विचारही केला नव्हता. आधी तो जे काही करतो ते पाहून राग येतो. पण नंतर त्याच्यासोबत जे घडतं ते पाहून त्याची दयाही येते. आता असं हा नवरा नेमकं काय करतो आणि त्याच्यासोबत नेमकं काय घडतं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती हातात उशी घेऊन एका खोलीत जाते. तिथं कुणीतरी झोपलेलं आहे. ही व्यक्ती हळूच ती उशी त्या व्यक्तीच्या तोंडावर ठेवते. ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नाही तर त्याची बायको असते. नवरा आपल्या बायकोला मारण्यासाठी आलेला असतो.

हे वाचा - अस्सं लग्न नको गं बाई! असं काही घडलं की मंडपातच चक्कर येऊन कोसळली नवरी

अरे पण हे काय, जसा नवरा उशी बायकोच्या तोंडावर ठेवतो, तशी बायको दुसऱ्या बाजूने ओरडते. पांघरूणातून ती डोकं बाहेर काढते आणि तिचं डोकं नेमकं बेडच्या विरुद्ध दिशेला असतं आणि तिचा नवरा डोकं समजून पायावर उशी दाबायला जातो. महिला हे काय करतो आहेस असं ओरडतच उठते. बायकोला पाहून नवऱ्याला घामच फुटतो. तो इतका घाबरतो की काय बोलावं तेच समजत नाही. कसंबसं करून तो तू थकली आहेस ना म्हणून पाय दाबतो आहे, असं सांगतो. त्यावेळी बायको नीट पाय दाब अशी ऑर्डर त्याला देते.

हे वाचा - अजबच! 'प्रेम पाहिजे की मटण'? पत्नीच्या त्या सवयीला कंटाळून पतीचा अल्टिमेटम

हा व्हिडीओ फक्त मजेसाठी बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे गांभीर्याने घेऊ नका. realsportsarena इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Couple, Funny video, Relationship, Viral, Viral videos, Wife and husband