मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजबच! 'प्रेम पाहिजे की मटण'? पत्नीच्या त्या सवयीला कंटाळून पतीचा अल्टिमेटम

अजबच! 'प्रेम पाहिजे की मटण'? पत्नीच्या त्या सवयीला कंटाळून पतीचा अल्टिमेटम

एका कपलमध्ये मांसाहार (Non-Veg Food) खाण्यावरुन सुरू झालेला वाद (Dispute Between Husband and Wife) इतका वाढला की पतीने पत्नीला थेट अल्टिमेटमच दिला.

एका कपलमध्ये मांसाहार (Non-Veg Food) खाण्यावरुन सुरू झालेला वाद (Dispute Between Husband and Wife) इतका वाढला की पतीने पत्नीला थेट अल्टिमेटमच दिला.

एका कपलमध्ये मांसाहार (Non-Veg Food) खाण्यावरुन सुरू झालेला वाद (Dispute Between Husband and Wife) इतका वाढला की पतीने पत्नीला थेट अल्टिमेटमच दिला.

नवी दिल्ली 03 डिसेंबर : पती आणि पत्नी यांच्यात लहान-मोठे वाद सुरूच असतात. मात्र एका कपलमध्ये मांसाहार (Non-Veg Food) खाण्यावरुन सुरू झालेला वाद (Dispute Between Husband and Wife) इतका वाढला की पतीने पत्नीला थेट अल्टिमेटमच दिला. पतीनं म्हटलं की पत्नीने हे ठरवावं, की तिला प्रेम पाहिजे की मटण. शाकाहारी पती आणि मांसाहार खाणारी पत्नी यांच्यातील हा वाद सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच चर्चेत आहे. एका व्हायरल ट्विटमध्ये पतीने कॉलमिस्टकडे आपल्या पत्नीबाबत सल्ला मागितला आहे. त्याची पत्नी मटण सोडण्यास नकार देत आहे. यावर अनेक यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्यक्तीने सांगितलं की त्याच्या पत्नीला घराबाहेर मटण खायला आवडतं (Non-Veg Lover). लग्न करण्याआधीच त्याला आपल्या भावी पत्नीला मटण आवडत असल्याचं या व्यक्तीला माहिती होतं. मात्र आपण मटण खाणं सोडू असं वचन पत्नीने दिलं होतं. मात्र, नुकतंच या व्यक्तीला समजलं की त्याची पत्नी अजूनही लपून मटण खाते. तिने आपलं वचन पूर्ण केलं नसून मांसाहार खाण्याची सवय कायम ठेवली आहे.

या व्यक्तीने पुढे लिहिलं की ती खूप सुंदर होती. त्यामुळे मी तिच्यासोबत या अटीवर लग्न करायला तयार झालो की इथून पुढे ती कधीही मटण खाणार नाही. मात्र आता ती सांगते की तिला मटण खूप आवडतं आणि ती त्याशिवाय राहू शकत नाही. यानंतर पतीनं आपल्या पत्नीला अल्टिमेटम देत म्हटलं, 'मटण की मी'. मात्र या व्यक्तीला आता भीती आहे की त्याची पत्नी त्याला सोडून मटण निवडू शकते.

पतीच्या या तक्रारीवर ट्विटर यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, की ही तर अनेक लोकांची समस्या आहे. तर दुसऱ्या एका लिहिलं, मटणाशिवाय राहाणं अशक्य. काही लोकांनी म्हटलं की ही आपली-आपली निवड आहे. तर काहींनी त्यांना एकमेकांसोबत बोलून हे प्रकरण हाताळण्याचा सल्ला दिला.

First published:

Tags: Food, Shocking news, Viral news