मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: पतीनं दिलेलं विचित्र गिफ्ट पाहून पर्स टाकून पळत सुटली पत्नी; यात असं नेमकं काय होतं?

VIDEO: पतीनं दिलेलं विचित्र गिफ्ट पाहून पर्स टाकून पळत सुटली पत्नी; यात असं नेमकं काय होतं?

एक पती आपल्या पत्नीला असं गिफ्ट (Gift for Wife) देतो  की ते पाहूनच पत्नी तिथून पळू लागते. या महिलेची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) पती पत्नीचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Videos of Husband and Wife) होत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंतीही मिळते. सध्या पती पत्नीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असून हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात एक पती आपल्या पत्नीला असं गिफ्ट (Gift for Wife) देतो की ते पाहूनच पत्नी तिथून पळू लागते. या महिलेची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सायकलवर एकसोबतच 9 मुलांना बसवून घेऊन जात होता व्यक्ती; VIDEO पाहून सगळेच हैराण

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला बाहेरून कुठून तरी आपल्या घरी परत आली आहे. ती घराचा दरवाजा उघडते तेव्हा तिला दिसतं, की तिच्या पतीनं तिच्या स्वागतासाठी जमिनीवर फुलाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. हे पाहून ती फार आनंदी होते. यानंतर जेव्हा ती पुढे चालत जाते, तेव्हा तिला दिसतं, की पतीनं एक रिबन लावलेली आहे. ही रिबन ती कात्रीनं कापते. यानंतर ती पुढे चालत जाते आणि किचनमध्ये पोहोचते. तिथेच तिच्या पतीनं तिच्यासाठी गिफ्ट ठेवलेलं असतं.

VIDEO: एवढ्याशा चिमुकलीनं आईला चपलेनं मारलं; महिलेनं मुलीला दिली अशी शिक्षा

महिला पाहते, की तिच्या पतीनं किचनच्या सिंकमध्ये भरपूर न घासलेली भांडी ठेवलेली असतात. महिलेसाठी तिच्या पतीनं हे विचित्र गिफ्ट ठेवलेलं असतं. हे पाहून महिलेला राग येतो. ही महिला खांद्यावर अडकवलेली आपली पर्स जमिनीवर फेकते आणि तिथून निघून जाते. पती पत्नीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरनं म्हटलं, की हे गिफ्ट अत्यंत वाईट आहे. तर, आणखी एका यूजरनं म्हटलं, की या महिलेला काम करायचं नाहीये.

First published:

Tags: Funny video, Wife and husband