Home /News /viral /

पतीने पत्नीला गिफ्ट केली 43 लाखाची गाडी; कारण जाणून व्हाल थक्क

पतीने पत्नीला गिफ्ट केली 43 लाखाची गाडी; कारण जाणून व्हाल थक्क

नुकतंच एका महिलेनं जेव्हा आपल्या पुश प्रेजेंटबद्दल सोशल मीडियावर सांगितलं (Pregnant Woman Got Present from Husband), तेव्हा लोक आश्चर्यचकीत झाले.

  नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : आजकालच्या काळात लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करून एखादा खास दिवस साजरा करतात आणि आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी नवनवीन गिफ्टही देतात. याच ट्रेंडमध्ये सध्या पुश प्रेजेंट (Push Present) हा प्रकारही गाजला आहे. यात पती आपल्या पत्नीला तेव्हा गिफ्ट देतो, जेव्हा ती त्याच्या बाळाला जन्म देणार असते. नुकतंच एका महिलेनं जेव्हा आपल्या पुश प्रेजेंटबद्दल सोशल मीडियावर सांगितलं (Pregnant Woman Got Present from Husband), तेव्हा लोक आश्चर्यचकीत झाले.

  उत्साहाने लग्नाच्या तारखेचा टॅटू गोंदवला; ऐनवेळी घडलं असं काही की हादरलं कपल

  ब्रिटिश राजकुमार प्रिन्स विलियम्सबद्दलही म्हटलं गेलं होतं की त्यांनी आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी आपली पत्नी केट हिला एक हिऱ्यांची डिझाईनर रिंग गिफ्ट दिली होती. हे गिफ्ट नक्कीच सुंदर होतं, मात्र तितकंही नाही जितकं कायली नावाच्या या महिलेला मिळालं आहे. कायलीने स्वतः @kayliemakenzie नावाच्या आपल्या टिकटॉक अकाऊंटवरुन हे गिफ्ट लोकांना दाखवलं. लवकरच बाळाला जन्म देणार असलेल्या कायलीने आपल्या टिकटॉक व्हिडिओमध्ये दावा केला आहे, की बाळाला जन्म देण्याच्या बदल्यात पतीने तिला अतिशय खास गिफ्ट दिलं आहे. यानंतर तिने तब्बल 44 लाखाची ब्रँड न्यू मर्सिडीज कार दाखवली. अमेरिकेत राहणारी कायली आपल्या कारच्या आतील दृश्यही लोकांना दाखवत आहे. 22 वर्षाच्या कायलीचा हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 3 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

  प्रेयसी झोपताच 85 महिलांना मेसेज पाठवायचा प्रियकर; लिहायचा 'हा' एकच शब्द

  व्हिडिओ पाहून हजारो लोकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. Mercedes AMG GLE53 Coupe पाहून लोक थक्क होऊन प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी नवीन कारसाठी तिचं अभिनंदन केलं आहे. तर काहींनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, माझा पती तर मला केवळ डोकेदुखीच देतो. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, असे गिफ्ट फक्त श्रीमंत लोकच देऊ शकतात, हे सामान्य लोकांसाठी नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Pregnant woman, Viral news

  पुढील बातम्या