नवी दिल्ली 04 सप्टेंबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ (Wild Animal Videos on Social Media) दररोज व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून आपला दिवसच चांगला जातो. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. यात एक हत्तीची आणि म्हैस (Friendship of Elephant and Buffalo) यांची मैत्री पाहून तुम्हीही म्हणाल, की मैत्री असावी तर अशी. गाढ झोपलेल्या बायकोला उठवण्यासाठी चक्क…; नवऱ्याचा भलताच उद्योग VIRAL आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे, की जनावरांमधील आपसातील प्रेम हे माणसांपेक्षाही जास्त असतं. कदाचित याच कारणामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याचीही त्यांना जास्त इच्छा असते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक म्हैस आणि हत्ती एकमेकांसोबत अत्यंत प्रेमानं वागताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हत्ती आणि म्हैस आपल्या आपल्या अंदाजात एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत.
Ivia the buffalo and his ele-friend Ndotto are both orphaned animals who we are giving a second shot at life. In the wild, the two species would usually keep their distance. In our care, they are united by a love of play are surprisingly gentle with one another. pic.twitter.com/pTZgriAh44
— Sheldrick Wildlife Trust (@SheldrickTrust) September 1, 2021
चक्क अजगराला घाबरुन वाघानं काढला पळ; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं एकीकडे म्हैस आपल्या शिंगानं धक्का देत हत्तीला प्रेमानं ढकलत आहे तर दुसरीकडे हत्तीही आपल्या सोंडेनं म्हशीला ढकलत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या मैत्रीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी मन जिंकणाऱ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की या दोघांचं प्रेम पाहून डोळ्यात आश्रू आले. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की ये दोस्ती हम नहीं तोडेंगे….तोड़ेंगे दम अगर तेरा साथा ना छोड़ेंगे. आणखी एका यूजरनं लिहिलं, मैत्री असावी तर अशी नाहीतर नसावी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ @SheldrickTrust नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं गेलंय, की इविया आणि नोटो दोघंही चांगले मित्र आहेत. हे एकमेकांची काळजी घेतात.