मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवऱ्यांनो खबरदार! Kiara Advani शी बायकोची तुलना कराल तर...; तुमचं काय होईल पाहा VIDEO

नवऱ्यांनो खबरदार! Kiara Advani शी बायकोची तुलना कराल तर...; तुमचं काय होईल पाहा VIDEO

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य -Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य -Canva)

कियारा अडवाणीशी बायकोशी तुलना केल्यानंतर नवऱ्याचं काय झालं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 05 फेब्रुवारी : कपलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. नवरा-बायकोचा हा व्हिडीओ आहे. ज्यात नवऱ्याने आपल्या बायकोची तुलना अभिनेत्री कियारा अडवाणीशी केली. पण हीच चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे. त्याला अशी शिक्षा मिळाली. जो तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही.

अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे. अशात एका व्यक्तीने तिची तुलना थेट आपल्या बायकोशी केली आहे. त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. नेमकं या व्यक्तीसोबत काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. नवरा-बायको आहेत. नवरा नकळतपणे आपल्या बायकोची तुलना अभिनेत्री कियारा अडवाणीशी करतो. यावेळी नवरा-बायकोत काय संवाद झाला तो आधी पाहुयात.

हे वाचा- हातापाया पडूनही ती ऐकली नाही; शेवटी हतबल BF ने GF च्या लग्नात...; VIDEO VIRAL

नवरा - डार्लिंग रागवू नको. मला माफ कर. ती एक अभिनेत्री आहे. तू अशी रागावते आहे जसं काय मी तिच्याशी लग्नच करायला जातो आहे.

पत्नी - जा तिच्याशीच लग्न कर. तुला इथं राहण्याची गरज नाही.

नवरा - हा माझ्याशी लग्न करायला ती उतावळीच झाली आहे.

बायको - नाही... नाही... ती तुमच्याशी लग्न करेल. सर्व तरुणी तुझ्याशीच लग्न करण्यासाठी उतावळ्या झाल्या आहेत.

नवरा - मी तिला एक अभिनेत्री म्हणून पसंत करतो. मी कोणत्या अभिनेत्रीलाही पसंत करू शकत नाही का?

बायको - मग तुम्ही माझी तुलना कियारा आडवाणीशी का केली. मी काय अभिनेत्री आहे?

नवरा - मला म्हणायचं होतं की ती चांगला अभिनय करते.

बायको - निघून जा. आज जेवण मिळणार नाही.

एकंदर तुम्हाला समजलं असेल की कियाराशी तुलना केल्याने बायको नवऱ्यावर इतकी संतप्त  झाली आहे की त्याचं खाणंपिणंच बंद करते.  नवऱ्याला आपली चूक कळते, तेव्हा तो तिची माफी मागतो, तिचा मूड ठिक करण्याचा, तिला मनवण्याचा, तिचा राग दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण तरी बायको काही ऐकत नाही. ती त्याला काही खाऊपिऊ न देताच किचनमधून बाहेर काढते.

हे वाचा - 22 वेळा तिने...; बेडरूममध्ये Girlfriend च्या 'त्या' कृत्यामुळे सीरिअल किलर Boyfriend चा गेला जीव

@PraveenSarraf_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  सोशल मीडियावर नवरा-बायकोच्या या मजेशीर संवादाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.  युझर्सनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बघ भावा, घराबाहेर काढेल, ती स्त्री आहे काहीही करू शकते. अशा कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया किंवा तुमचा असा काही किस्सा असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Couple, Kiara advani, Viral, Viral videos, Wife and husband