लंडन, 04 फेब्रुवारी : कपलच्या बऱ्याच लव्ह स्टोरी, किस्से तुम्हाला माहिती असतील. प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. म्हणून तर प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक महिला जी एका सीरिअल किलरच्या प्रेमात पडली. पण गर्लफ्रेंडमुळेच या सीरिअर किलर बॉयफ्रेंडचा जीव गेला आहे. तिने त्याच्यासोबत बेडरूममध्ये असं काही केलं की त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. शाय ग्रोव्स असं या महिलेचं नाव आहे. 27 वर्षांची शाय एका सीरिअल किलर फ्रँकी फित्झगेरॅल्डच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत तिने जे केलं त्यामुळे त्याचा जीव गेला. बॉयफ्रेंड बेडवर नीट परफॉर्म करत नव्हता, त्यामुळे तिने त्याची हत्याच केली. कित्येकांचा जीव घेणाऱ्या या सीरिअर किलरला त्याच्याच गर्लफ्रेंडने अतिशय भयंकर पद्धतीने मारलं आहे.
हे वाचा - जिच्यासोबत रात्र घालवली ती...; Bra मुळे तरुणाला समजलं तरुणीचं 'ते' सिक्रेट
विनचेस्टर क्राऊन कोर्टात महिलेच्या वकिलाने दावा केला की तिचा बॉयफ्रेंड बेडरूममध्ये नीट परफॉर्म करत नव्हता. पण हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याचे आणखी काही मुलगी आणि लहान मुलींसोबत संबंध होते. याचा महिलेला राग होता. ती इतकी संतप्त झाली की तिने बॉयफ्रेंडची अशा भयंकर पद्धतीने हत्या केली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार महिलेने त्याच्यावर 22 वेळा चाकूने हल्ला केला. त्याची निर्घृण हत्या केल्यानंतरर त्याच्या मृतदेहासमोर उभी राहून हसू लागली. यानंतर तिने आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला आणि त्याला हे सर्वकाही सांगितलं तसंच तिने सर्वकाही दाखवलंही.
या दोघांचा मित्र असलेला विक्की बायटपने सांगितलं की तिने याआधीही असं केलं आहे. ती लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. त्यांनी तिला फसवलं की त्यांची हत्या करायची. लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवायची आणि संधी साधून त्यांचा पैशांसाठी वापर करायची. एकदा तिने आपल्या रूममेटवर नेल क्लिपर्सनेही हल्ला केला होता.
हे वाचा - कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था
तिच्यावर तब्बल 25 हत्येचे गुन्हेही दाखल आहेत. बॉयफ्रेंडसह मिळून तिने या हत्या केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Couple, Crime, Girlfriend, Viral, World news