नवी दिल्ली, 19 जुलै : हॅलो… मला आज तुझी खूप आठवण येते आहे… तुम्हाला माझी आठवण येते की नाही… पती-पत्नी एकमेकांपासून दूर असले की मेसेज किंवा फोनवरील त्यांचं हे ठरलेलं वाक्य. कदाचित तुम्हीही तुमच्या जोडीदाराला असं कधी ना कधी विचारलं असेलच. पण जोडीदाराच्या याच आठवणीने कुणी मालामाल झालं असं सांगितलं तर… असाच चमत्कार घडला एका व्यक्तीसोबत. जी बायकोची आठवण काढून करोडपती बनली आहे. मुलगी असो… बायको असो… सून असो… महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो, असंही म्हणतात. पण बायकोची आठवणही लकी ठरू शकते, असा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? चीनमधील एक व्यक्ती याबाबतीत लकी ठरली. पत्नीची आठवण काढून काढून तिचं नशीब फळफळलं. रातोरात ती करोडपती बनली आहे.
झेजियांग प्रांतातील हांझोऊत राहणारी ही 30 वर्षांची ही व्यक्ती. त्याचं लग्न होऊन त्याला तीन मुलं होती. पण तो आपल्या कुटुंबासोबत राहत नव्हता. कामासाठी त्याला कुटुंबापासून दूर राहावं लागत होतं. बायको-मुलांपासून दूर राहून दुसऱ्या शहरात तो काम करत होता. त्याला पत्नी आणि मुलांची खूप आठवण यायची. या आठवणीत त्याने असं काम केलं की त्याचं नशीबच पालटलं. इथं फक्त KISS करण्यासाठी लागते लांबच लांब रांगा; तुम्हाला माहिती आहे का हे अजब रोमँटिक ठिकाण बायको आणि मुलांच्या आठवणीत तो लॉटरीची तिकिटं खरेदी करू लागला. पत्नी आणि मुलांच्या जन्मतारखेनुसार तो तिकीटं घ्यायचा. एक दिवस त्याने 30 युआन म्हणजे 300 रुपयांना 15 लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती आणि काय त्याला लॉटरी लागली. प्रत्येक लॉटरीमागे 5.15 मिलिअन युआन असे त्याला एकूण एकूण, त्याला 77.1 दशलक्ष युआन मिळाले. भारतीय चलनानुसार तो 90 कोटी रुपये जिंकला. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, त्याने आपण पत्नी आणि मुलांच्या आठवणीत लॉटरी तिकीट निवडल्याचं सांगितलं. डेंजरस इश्क! गर्लफ्रेंडच्या Love Bite ने घेतला बॉयफ्रेंडचा जीव; नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL कुठे तो दुसऱ्या शहरात नोकरीसाठी भटकत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंबापासून दूर राहात होता. पण दूर राहूनही त्याचं कुटुंब त्याच्यासाठी लकी ठरलं. नोकरीसाठी भटकणारा तो रातोरात कोट्यवधींचा मालक बनला.