जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इथं फक्त KISS करण्यासाठी लागते लांबच लांब रांगा; तुम्हाला माहिती आहे का हे अजब रोमँटिक ठिकाण

इथं फक्त KISS करण्यासाठी लागते लांबच लांब रांगा; तुम्हाला माहिती आहे का हे अजब रोमँटिक ठिकाण

फोटो - ट्विटर

फोटो - ट्विटर

इथं जाऊन किस करण्याची इच्छा अनेक कपलची असते.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मेक्सिको, 30 जून : तशी जगभरात अशी बरीच ठिकाणं आहेत जी लव्हर्स स्पॉट किंवा रोमँटिक प्लेस म्हणून ओळखली जातात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अशा ठिकाणी किमान एकदा तरी गेला असाल. पण तुम्हाला असं ठिकाण माहिती आहे का, जिथं कपल फक्त किस करण्यासाठी येतात? तुम्हाला आश्चर्य वाटेल या ठिकाणी किस करायला येणाऱ्या कपलच्या लांबच लांब रागा लागलेल्या असतात. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम अगदी बहरून येतं. म्हणूनच कपल निसर्गरम्य परिसरात फिरायला जातं. कुणी गार्डन, कुणी समुद्रावर फिरताना दिसतं. निसर्गाच्या कुशीत एकमेकांच्या मिठीत हे कपल हरवून जातं. पण असं ठिकाण जिथं फक्त किससाठीच कपल येतं. इथं जाऊन किस करण्याची इच्छा अनेक कपलची असते.

News18लोकमत
News18लोकमत

प्रचलित कथेनुसार, या ठिकाणी एक प्रियकर-प्रेयसी राहायचे, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण त्यांचं नातं एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं होतं. मुलगी श्रीमंत आणि मुलगा गरीब कुटुंबातील. मुलीच्या घरच्यांनी नकार दिल्यानंतरही मुलगी त्या मुलाला भेटायला जायची. याचा राग आल्याने घरच्यांनी त्यांची हत्या केली. तेव्हापासून लोक प्रेमाचं प्रतीक म्हणून इथं येऊन चुंबन घेऊ लागले. तेव्हापासून हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. टिप टिप बरसा पाणी… आणि कपल झालं रोमँटिक; रस्त्यावरच केलं असं काही की VIDEO VIRAL इथं जोडप्याने चुंबन घेतलं, तर त्यांची लव्ह लाइफ चांगली असते, असं म्हणतात. म्हणूनच इथं येण्यासाठी कपलची इच्छा असते.  खरंतर हा एक रस्ता आहे, जो अगदी लहान आहे. तिथं 2 पेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाहीत. म्हणूनच एका वेळी फक्त एका जोडप्याला आत प्रवेश दिला जातो. त्यामुळे या गल्लीबाहेर जोडप्यांची लांबच लांब रांग असते. इथं इतकी गर्दी असते की काही जोडप्यांना किस न करताच परत जाण्याची वेळ येते. नवऱ्याने केली अशी टेस्ट, ज्यामुळे समोर आलं बायकोने 18 वर्षे लपवलेलं सिक्रेट आता हे ठिकाण आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. मेक्सिकोच्या गुआनाजुआटोमध्ये हे ठिकाण आहे. Alley of Kiss म्हणून ते ओळखलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात