मेक्सिको सिटी, 26 जून : रोमान्स करताना लव्ह बाइट करायला अनेक कपल्स ना आवडतं. ही प्रेम व्यक्त करण्याची एक भाषा. पण प्रेमाची हीच भाषा जीवघेणी ठरू शकते, असा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? तुम्हाला वाचूनच धक्का बसेल पण गर्लफ्रेंडच्या लव्ह बाईटमुळे बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमधील ही धक्कादायक प्रकरण आहे. ज्याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. ज्युलियो मॅकियास गोन्झालेझ नावाचा 17 वर्षांचा मुलगा सोशल मीडिया टिकटॉकवर खूप चर्चेत आला आहे. इझतपलापा येथील रहिवासी असलेल्या ज्युलिओचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो आपला मृत्यू कसा झाला हे सांगत आहे.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ज्युलिओ त्याच्या 24 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता. तिने त्याच्या गळ्यावर लव्ह बाईट दिली. प्रेमींमध्ये हिकी सामान्य आहे, असं समजून ज्युलिओने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण आपल्या बाबतीत हे प्रकरण गंभीर होणार आहे हे त्याला माहीत नव्हतं. दिवसभर दोघांनी एकत्र घालवल्यानंतर दोघंही ज्युलिओच्या घरी आई-वडिलांसोबत जेवायला गेले. जेवता जेवता अचानक ज्युलिओ बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. अजब प्रकरण! मुलाच्या टेस्टचा असा परिणाम; रिझल्ट येताच मोडला आई-वडिलांचा संसार त्याच्या पालकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्याला हॉस्पिटलला नेलं. पॅरामेडिक्स वेळेवर आले असतानाही मुलाचा जीव वाचू शकला नाही. मुलाची तपासणी केली असता लव्ह बाईटमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले. मानेवर दातांनी चावल्याने त्वचेच्या आतल्या रक्तवाहिन्या फुटतात, त्यामुळे तिथं रक्त गोठतं. ज्युलिओच्या बाबतीत रक्ताच्या गुठळ्या इतक्या प्रमाणात जमा झाल्या की त्याच्या मेंदूतही गुठळी निर्माण झाली. त्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्याही फुटतात. या बागेत जाताच चढतो रोमान्स; खास कपल्ससाठी रोमँटिक गार्डन, कुठे आहे पाहा PHOTO 2016 सालचं हे प्रकरण आहे. 25 ऑगस्ट 2016 रोजी घडलेली ही घटना. मृत मुलाच्या एआय अवताराच्या व्हिडीओसह सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होते आहे.
Super Interesante युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आहे.