Home /News /viral /

जिवलग मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला; नवरीच्या या अजब निर्णयामागचं कारण वाचून चक्रावून जाल

जिवलग मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला; नवरीच्या या अजब निर्णयामागचं कारण वाचून चक्रावून जाल

अलिनाने टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की तिच्या मैत्रिणीने तिला आपल्या लग्नात येण्यापासून यामुळे अडवलं कारण ती नवरीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती (Wedding Look).

    नवी दिल्ली 18 डिसेंबर : आपल्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं लग्न (Friend's Marriage) हा कोणासाठीही अतिशय खास दिवस असतो. लग्नाच्या दिवशी मित्र-मैत्रिणी असं वागतात जणू संपूर्ण कार्यक्रमावर त्यांचा हक्क आहे. यामुळे मित्राच्या लग्नात हे लोक भरपूर एन्जॉय करतात. मात्र कधी तुम्ही असं ऐकलं आहे का की एखाद्या नवरीने आपल्या मैत्रिणीलाच लग्नात येण्यास मनाई केली कारण ती तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसते (Friend Looking more Pretty than Bride). डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जर्मनीमध्ये राहणारी 21 वर्षीय मॉडेल आणि कंटेट क्रिएटर अलीन यिल्दिज हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अलिनाने टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की तिच्या मैत्रिणीने तिला आपल्या लग्नात येण्यापासून यामुळे अडवलं कारण ती नवरीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती (Wedding Look). Birthday आहे मालकाचा! कुत्र्याचं सेलिब्रेशन पाहून अवाक व्हाल; पाहा VIDEO अलिनाने सांगितलं की काही दिवसांपूर्वीच तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं. अलिना अतिशय उत्साही होती. अलिनाच्या मैत्रिणीने तिला लग्नासाठी एक खास गाउनही घेऊन दिला होता. मात्र जेव्हा अलिनाने हा गाउन घालून आपले फोटो नवरीला पाठवले तेव्हा भलतंच काही घडलं. अलिनाने सांगितलं की ती या गाउनमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. हे पाहून नवरीबाईही हैराण झाली की मीच घेऊन दिलेल्या गाउनमध्ये अलिना इतकी सुंदर कशी दिसू शकते. अलिनाने या गाउनमधील आपले अनेक फोटो टिकटॉकवर शेअर केले आहेत. सोबतच तिने आपले व्हिडिओही पोस्ट केले असून याला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र लोक अलिनाच्या मैत्रिणीवर अतिशय नाराज आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या गोष्टीसाठी अनेकांनी अलिनाची निंदा केली आहे. हद्दच झाली! GF साठी त्याने जे केलं ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल एका व्यक्तीने म्हटलं की नवरीने स्वतःच तिला हा ड्रेस घेऊन दिला मग ती तिच्यावर का जळत होती आणि दोघी इतक्या चांगल्या मैत्रिणी होत्या तर नवरीने तिला सांगायला हवं होतं की तू हा ड्रेस घालून येऊ नको. मात्र लग्नात येण्यावरच बंदी घालणं चुकीचं आहे. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, की नवरीने हा विचारच नाही करायला हवा की कोणीतरी तिच्यापेक्षाही सुंदर दिसत आहे. लग्नात कोणी कितीही सुंदर दिसलं तरी सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन नवरीच असते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Wedding

    पुढील बातम्या